Wednesday, 7 May 2025
  • Download App
    मतदारांना भेटवस्तू वाटल्याप्रकरणी काँग्रेस आमदार आणि मुलावर FIR; जेडीएस आमदार अपात्र|FIR against Congress MLA and son for distributing gifts to voters; JDS MLA disqualified

    मतदारांना भेटवस्तू वाटल्याप्रकरणी काँग्रेस आमदार आणि मुलावर FIR; जेडीएस आमदार अपात्र

    वृत्तसंस्था

    बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी काँग्रेस आमदार शमनूर शिवशंकरप्पा, त्यांचे सुपुत्र काँग्रेसचे माजी आमदार शामनूर मल्लिकार्जुन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना भेटवस्तू वाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.FIR against Congress MLA and son for distributing gifts to voters; JDS MLA disqualified

    दावणगेरे जिल्ह्यातील केटीजे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील स्थानिक महिलांनी मोफत भेटवस्तू वाटल्याबद्दल शामनूर शिवशंकरप्पा यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. आमदार शामनुर शिवशंकरप्पा आणि त्यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते शामनुर मल्लिकार्जुन यांनी वाटप केलेल्या भेटवस्तू दावणगेरे येथील ग्रामस्थांनी आग लावून पेटवून दिल्याचे महिलांनी सांगितले.



    JD(S) आमदार निवडणूक गैरव्यवहारासाठी अपात्र

    कर्नाटक उच्च न्यायालयाने तुमकुरू ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार डीसी गोरीशंकर स्वामी यांना निवडणूक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अपात्र ठरवले आहे. मात्र, न्यायालयाने अपात्रतेला महिनाभरासाठी स्थगिती दिली आणि स्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची परवानगी दिली. पराभूत भाजप उमेदवार बी. सुरेश गौडा यांनी आरोप केला होता की, स्वामी यांनी 2018 च्या निवडणुकीत मतदारांना बनावट विमा बाँड वाटून निवडणूक गैरव्यवहार केला होता.

    दरम्यान, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी यावेळी विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येडियुरप्पा यांनी वयाचा हवाला देत ही घोषणा केली. पत्रकार परिषदेत येडियुरप्पा म्हणाले, मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची 80 वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला.

    ते पुढे म्हणाले की, माझे वय 80 पेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे. येडियुरप्पा पुढे म्हणाले, कर्नाटकात आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ.

    FIR against Congress MLA and son for distributing gifts to voters; JDS MLA disqualified

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर- भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानवर एअर स्ट्राइक, 24 क्षेपणास्त्रे डागली, 100 हून जास्त अतिरेकी ठार

    अहिल्यानगरमध्ये पोलीस वसाहत अन् प्रशासकीय इमारतीच्या विकासासाठी 102 कोटींचा प्रकल्प

    पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!

    Icon News Hub