गतवर्षी देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी लॉकडाऊनला विरोध सुरू केला. सातत्याने त्यांनी लॉकडाऊनविरोधीच वक्तव्ये केलेली आहेत. आता मात्र राहुल गांधींनी आपल्या भूमिकेपासून पूर्णपणे यूटर्न घेत देशात कडकडीत लॉकडाऊन लावण्याची मागणी केली आहे. Find out how Rahul Gandhi Changed His Oppose in Support To lockdown
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गतवर्षी देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी लॉकडाऊनला विरोध सुरू केला. सातत्याने त्यांनी लॉकडाऊनविरोधीच वक्तव्ये केलेली आहेत. आता मात्र राहुल गांधींनी आपल्या भूमिकेपासून पूर्णपणे यूटर्न घेत देशात कडकडीत लॉकडाऊन लावण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी आज केलेल्या ट्वीटमध्ये केंद्र सरकारला सल्ला दिला आहे की, कोरोना महामारीला आळा घालण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन आहे. कमकुवत घटकांसाठी न्याय योजनेची सुरक्षाही असावी, असे ते म्हणाले आहेत.
परंतु यापूर्वी राहुल गांधींनी लॉकडाऊनबाबत केलेल्या वक्तव्यांवर नजर टाकली तर त्यांची भूमिका पूर्णपणे बदलल्याचे लक्षात येते.
16 एप्रिल 2020 : राहुल गांधी म्हणाले होते की, लॉकडाऊन कोरोनाला रोखू शकत नाही, त्याऐवजी धोरणात्मक व अचूक हाताळणी गरजेची आहे. टेस्टिंगही वाढवायला पाहिजे.
5 जून 2020 : राहुल गांधी म्हणाले होते की, भारतात लॉकडाऊन पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
9 सप्टेंबर 2020 : राहुल गांधी एका व्हर्च्युअल मीटिंगमध्ये म्हणाले होते की, लॉकडाऊन हा गरीब भारतावर मोठा हल्ला होता. यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरून केंद्रावर टीकेची झोड उठवली होती.
19 मार्च 2021 : द हिंदू दैनिकातील बातमीनुसार राहुल गांधी म्हणाले होते की, लॉकडाऊनमुळे अजूनही देशाला त्रास होत आहे.
16 एप्रिल 2021 : राहुल गांधी म्हणाले होते की, केंद्राची कोविड विरुद्ध लढण्याची रणनीती दुसरे काही नसून तुघलकी लॉकडाऊन आहे.
गतवर्षभर लॉकडाऊन उपयोगाचा नाही म्हणणाऱ्या राहुल गांधींची भूमिका पूर्णपणे बदलल्याचे यावरून दिसून येते. देशात सध्या दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत असल्याने अनेक शास्त्रज्ञांनी, कोविड टास्क फोर्स व उद्योजक संघटनांनी संपूर्ण लॉकडाऊनचे आवाहन केले आहे. तथापि, हे सर्वांच्या आधीच केंद्र सरकारने एप्रिलच्या मध्यातच लॉकडाऊनचा निर्णय राज्यांनी स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा केंद्राने दिलेली आहे. यानुसार, विविध राज्यांनी स्थानिक लॉकडाऊनही जाहीर केला आहे. त्याचा परिणाम आता दिसायला सुरुवात झाली असून महाराष्ट्र व दिल्लीसारखी सर्वाधिक रुग्णसंख्येच्या राज्यांमध्ये आता कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. महाराष्ट्रात मागच्या 30 दिवसांत पहिल्यांदा काल 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत.
Find out how Rahul Gandhi Changed His Oppose in Support To lockdown
महत्त्वाची बातमी
- मोठी बातमी : IPL रद्द, बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय, अनेक संघांतील खेळाडूंना कोरोनाची लागण
- भारताचे पहिले लढाऊ विमान सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन, कलामांसोबतही केले होते काम
- बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश
- बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे
- बंगालमध्ये भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्या घरावर तृणमूलच्या गुंडांचा बॉम्बहल्ला, गृहमंत्री अमित शाहांनी पाठवली मदत