अंघोळ करताना आला हृदयविकाराचा झटका
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. Filmmaker Raj Kumar Kohli passed away due to a heart attack
राजकुमार कोहलीने ‘जानी दुश्मन’पासून ‘राज टिलक’ आणि ‘बदले की आग’पर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबातच नव्हे तर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्याचा मुलगा आणि बिग बॉस 7 च्या स्पर्धक अरमान कोहली याने अद्याप वडिलांच्या निधनाबाबत मीडियामध्ये काहीही सांगितलेले नाही.
मात्र, दिग्दर्शकाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, राज कुमार कोहली आंघोळीसाठी गेले होते, पण बराच वेळ ते बाहेर न आल्याने त्यांचा मुलगा आणि अभिनेता अरमान कोहली दरवाजा तोडून आत गेला, जिथे त्याचे वडील पडलेले होते. बेशुद्ध अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
राजकुमार कोहली 1966 चा चित्रपट ‘दुल्ला भट्टी’ आणि 1970 च्या दशकातील दारा सिंह स्टार चित्रपट ‘लुटेरा’ सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या इतर लोकप्रिय चित्रपटांमध्ये नागिन (1976), जानी दुश्मन (1979), बदले की आग, नौकर बीवी का आणि राज टिलक (1984) या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा सुनील दत्त, धर्मेंद्र, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय आणि अनिता राज यासारखे कलाकार होते.
Filmmaker Raj Kumar Kohli passed away due to a heart attack
महत्वाच्या बातम्या
- PNB Scam : नीरव मोदीला कोर्टाचा आणखी एक झटका, ७१ कोटींची मालमत्ता विक्रीचे आदेश
- महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी बातमी; वैद्यकीय शिक्षणाच्या श्रेणीवर्धनासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत!!
- जम्मूमध्ये घातपाचा मोठा कट उधळला ; ‘LOC’जवळ ड्रोनद्वारे फेकलेली शस्त्र सुरक्षा दलांनी केली जप्त!
- अयोध्या – काशी – मथुरा; श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन घेऊन पंतप्रधान मोदींनी वाजविला पुढच्या कामाचा डंका!!