• Download App
    फारुख अब्दुल्ला म्हणाले- केवळ हिंदूंचेच नाही, प्रभू राम सर्वांचे आहेत, सत्तेसाठी भाजपकडून वापर|Farooq Abdullah said - not only for Hindus, Lord Ram belongs to everyone, use by BJP for power

    अल्लाहनेच प्रभू श्रीरामाला पृथ्वीवर पाठविले… फारूख अब्दुल्ला पुन्हा बरळले!

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी म्हटले की, भाजपने सत्तेत राहण्यासाठी रामाच्या नावाचा वापर केला. प्रभू राम केवळ हिंदूंचेच नाही, तर सर्वांचे आहेत. मग ते हिंदू असो वा मुस्लिम, शीख किंवा इतर कोणताही समाज.Farooq Abdullah said – not only for Hindus, Lord Ram belongs to everyone, use by BJP for power

    ते म्हणाले की, जर तुमच्या मनात राम फक्त हिंदूंचा आहे, हा समज असेल तर तो काढून टाका. त्याचप्रमाणे, अल्लाह फक्त मुस्लिमांसाठी नाही, तर सर्वांसाठी आहे. जे तुमच्याकडे येतात आणि सांगतात की मी प्रभू श्रीरामांना मानतो, ते खरे तर प्रभू रामाचे नाव विकत आहेत.



    काश्मीरमधील निवडणुकीदरम्यान राम मंदिराचे उद्घाटन करणार

    वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला गुरुवारी पँथर्स पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त उधमपूरला पोहोचले. यावेळी लोकांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, मला वाटते की जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर होतील तेव्हा ते सामान्यांचे लक्ष वळवण्यासाठी राम मंदिराचे उद्घाटन करतील, परंतु यामुळे आमच्या ऐक्याला बाधा येणार नाही. काँग्रेस असो, एनसी असो किंवा पँथर्स असो, आम्ही लोकांसाठी लढत राहू.

    ईव्हीएम वापरताना काळजी घ्या

    त्यांनी जनतेला भाजपपासून सावध राहण्याचे आवाहन केले. फारुख म्हणाले की, ते निवडणुकीच्या वेळी ‘हिंदू धोक्यात आहे’चा वापर करतील, पण मी तुम्हाला त्याला बळी पडू नका अशी विनंती करतो. त्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) बद्दल प्रश्न उपस्थित केले आणि लोकांना त्याच्या वापराबद्दल सावध राहण्यास सांगितले.

    Farooq Abdullah said – not only for Hindus, Lord Ram belongs to everyone, use by BJP for power

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार