वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, आपण काश्मीरी युवकांशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचा टोला अमित शहांनी डॉ. अब्दुल्ला यांना लगावला आहे. Farooq Abdullah advises me to talk to Pakistan, but I will befriend Kashmiri youth; Amit Shah’s Tola
तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या वेळी युवकांच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. अमित शहा म्हणाले, की मी आज सकाळी वर्तमान पत्रात वाचले की डॉ. फारूख अब्दुल्लांनी मला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. अब्दुल्ला मोठे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पण मी काश्मीरमध्ये युवकांशी संवाद साधायला आलो आहे. इथे कोणतेही बुलेटप्रुफ जॅकेट नाही. कोणतीही जादा सुरक्षा व्यवस्था लावलेली नाही. मी थेट काश्मीरी युवकांशी बोलतो आहे.
आत्तापर्यंत मला अनेकांनी टोमणे मारले. मी जम्मू – काश्मीरच्या जनतेच्या विरोधात असल्याच्या बाता त्यांनी मारल्या, अशी टीका करून अमित शहा म्हणाले, की आधीच्या राज्यकर्त्यांनी जम्मू – काश्मीरच्या जनतेशी समान न्याय केला का… त्यांनी सतत भेदभाव केला. जम्मू आणि लडाखच्या जनतेला विकासापासून, सरकारी नोकऱ्या, सुविधांपासून वंचित ठेवले. तीन परिवारांनी मिळून काश्मीरची लूट केली. त्याचा जाब या परिवारांना विचारण्याची वेळ आता आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने जम्मू – काश्मीर आणि लडाख या केंद्र शासित प्रदेशांसाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी भेदभावरहित केली जाते आहे. रोजगाराच्या नव्या संधी जम्मू – काश्मीरच्या युवकांना समानतेने उपलब्ध होत आहेत, याकडे अमित शहा यांनी आवर्जून लक्ष वेधले.
Farooq Abdullah advises me to talk to Pakistan, but I will befriend Kashmiri youth; Amit Shah’s Tola
महत्त्वाच्या बातम्या
- चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू
- कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या हालचाली गतिमान, लसीकरण वेगाने होण्यासाठी प्रयत्न
- आर्यन खानला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा , शाहरुख खानला दिला सल्ला ; राज्यमंत्री रामदास आठवले –
- साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्याजवळ एसटी बस भस्मसात, प्रवासी सुखरूप
- वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक प्रयोग अमेरिकेत यशस्वी , डुकराच्या किडनीचे मनुष्यात प्रत्यारोपण