विशेष प्रतिनिधी
करनाल – हरियानाच्या करनाल प्रशासनाने बसताडा येथील लाठीमाराची न्यायिक चौकशी आणि मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकास नोकरी देण्याची तयारी दर्शविल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे त्यामुळे खट्टर सरकारने सुटकेचा निश्वास सोडला आहे.Farmers agitation called off in Haryana
लाठीमाराचा आदेश देणारे जिल्हाधिकारी आयुष सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. लाठीमाराची चौकशी करणे, लाठीमाराचा आदेश देणारे आयएस अधिकारी आयुष सिन्हा यांना निलंबित करणे, मृतांच्या नातेवाईकास नोकरी आणि २५ लाखांची मदत करणे, जखमींना प्रत्येकी दोन लाखांची मदत करणे या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या.
आता बसताडा टोलनाक्यावर शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची न्यायिक चौकशी होणार आहे. ही चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जाणार आहे. चौकशीची मागणी पूर्ण करण्याबरोबरच प्रशासनाने आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
लाठीमारात मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकास नोकरी देण्याची मागणी मान्य केली आहे. एका आठवड्याच्या आत जिल्हा प्रशासनात संबंधितास नोकरी दिली जाणार आहे. प्रशासनाच्या निमंत्रणानंतर गुरमान सिंग चढूनी यांच्या नेतृत्वाखाली सुरेश कौथ आणि रतन मान यांच्यासह शेतकरी संघटनेच्या १३ नेत्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Farmers agitation called off in Haryana
महत्त्वाच्या बातम्या
- अनपेक्षितपणे सत्ता मिळाली! उध्दव ठाकरे यांनी थोबाडीत मारली तरी सरकारमधून बाहेर पडणार नाही, ज्येष्ठ मंत्र्यानेच म्हटल्याचा चंद्रकांत पाटील यांचा पोलखोल
- निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
- ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!