कर्नाटक सरकारने भरपाईची रक्कम वाढवली आहे
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू – Siddaramaiah आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चॅम्पियन झाल्यानंतर, बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक जल्लोष आयोजित करण्यात आला होता, मात्र त्याचे रूपांतर शोकसागरात झाले. RCB च्या विजयाच्या जल्लोषात सामील होण्यासाठी आलेले काही चाहते त्यांच्या घरी परतू शकले नाहीत. कारण, मोठ्यासंख्येने चाहते जमल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली व त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले .Siddaramaiah
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी भरपाई वाढवली आहे. सरकारने यापूर्वी पीडित कुटुंबाला १० लाख देण्याची घोषणा केली होती. आता सरकारने ही रक्कम २५ लाखांपर्यंत वाढवली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून १८ वर्षांनंतर पहिले विजेतेपद जिंकले. हे विजेतेपद जिंकल्यानंतर, विराट कोहली देखील खूप भावनिक दिसला, कारण तो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच आरसीबीशी जोडला गेला होता. या विजयाच्या दुसऱ्याच दिवशी, आरसीबीने कोणत्याही व्यवस्थेशिवाय घाईघाईत एका विजयी रॅलीचे आयोजन केला. त्यानंतर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले.
कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने यापूर्वी बेंगळुरू चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना १० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली होती, परंतु आता ही भरपाई वाढवण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आता पीडितांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देणार आहे. त्याच वेळी, आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची घोषणाही केली होती.
बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) विरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांच्यावर गुन्हेगारी निष्काळजीपणा आणि अनावधानाने खून केल्याचा आरोप आहे, त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसाळे, डीएनए एंटरटेनमेंटचे सुनील मॅथ्यू, सुमंत आणि किरण कुमार यांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना १४ दिवसांसाठी तुरुंगात पाठवले आहे.
Families of those killed in Bengaluru stampede to be given Rs 25 lakh
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे बंधू आणि पवार बहीण – भावांच्या ऐक्यासाठी माध्यमांचीच घायकुती; मुख्य नेते निवांत, इतरांच्याच लुडबूडी!!
- corona patient : भारतात कोरोना रुग्णांची संख्येने ओलांडला पाच हजारांचा टप्पा ; २४ तासांत ४ मृत्यू
- Madras High Court : मद्रास हायकोर्टाने म्हटले- समलैंगिक जोडपे कुटुंब बनवू शकतात; लग्न कुटुंब स्थापन करण्याचा एकमेव मार्ग नाही
- Mamata Banerjee : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत तृणमूलच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपने घेतली आक्रमक भूमिका