• Download App
    Expectations of India from Putin India tour पुतिन यांच्या बहुचर्चित दौऱ्यातून भारताची अपेक्षा काय??, मिळणार काय??

    पुतिन यांच्या बहुचर्चित दौऱ्यातून भारताची अपेक्षा काय??, मिळणार काय??

    modi putin

    रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर जाण्याची अपेक्षा असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारी आणि प्रशासने त्या दृष्टीने तयारी केली आहे.Expectations of India from Putin India tour

    भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध आणि व्यवहार पूर्वीपासूनच दृढ आणि मोठ्या उंचीवर आहेत. रशियाने भारताला सर्व प्रकारची लष्करी सामग्रीची मदत यापूर्वी पासून केली आहे त्यात आता लष्करी सामग्री तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि प्रदानाची भर पडली आहे. भारताला रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी सामग्री उत्पादना संदर्भातले तंत्रज्ञान मिळणे अपेक्षित आहे.

    – कोणत्या क्षेत्रांमध्ये होणार करार??

    पण त्या पलीकडे जाऊन भारत आणि रशिया यांच्यातले व्यापारी संबंध अधिक दृढमूल करण्यासाठी पुतिन यांचा दौरा लाभकारी ठरणार आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातल्या विविध क्षेत्रातल्या सहकार्याविषयीचे मोठे करार होणार आहेत. यामध्ये औषध निर्मिती, वाहन निर्मिती, कृषी उत्पादने, त्याचबरोबर सागरी वाहतूक उत्पादने यांचाही समावेश असून भारताला यानिमित्ताने रशियन बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.



     

    – औषध निर्मिती ते सागरी उत्पादने

    औषध निर्मिती, वाहन निर्मिती, कृषी उत्पादने आणि सागरी वाहतूक उत्पादने यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून, भारतीय उत्पादने जागतिक स्पर्धेत उतरून ती अनेक वेळा अव्वल ठरली आहेत. त्यामुळे रशियन बाजारपेठेत या भारतीय उत्पादनांना मोठी मागणी आहे.

    पुतिन यांनी आपल्या दौऱ्यात रशियातील बड्या व्यापारांचा समावेश केला असून भारतीय व्यापारी आणि रशियन व्यापारी यांच्यात मोठे करार होणार आहेत. त्याचबरोबर शिपिंग हेल्थकेअर, फर्टीलायझर्स या क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठे करार होणे अपेक्षित आहे. हेल्थकेअर क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतातली हेल्थकेअर अधिक स्वस्त, परिणामकारक आणि लाभकारक आहे. त्यामुळे रशियन नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या सर्व करारांमधून भारतात विविध क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होणे सुद्धा अपेक्षित आहे.

    त्यामुळे पुतिन यांच्या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले संबंध केवळ राजनैतिक, लष्करी आणि सामरिक न राहता ते व्यापाराच्या दृष्टीने अधिक विस्तारलेले होणे अपेक्षित आहे.

    – केवळ अमेरिकन चष्मा नको

    भारत आणि रशिया यांच्या संबंधांकडे केवळ अमेरिकन आणि युरोपियन चष्म्यातून न पाहता भारत आणि रशिया यांच्या स्वतंत्र दृष्टीकोनातून विकासात्मक भावाने त्याकडे पाहिले पाहिजे अशी दोन्ही देशांच्या सरकारांची भावना आहे.

    Expectations of India from Putin India tour

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    K Kavitha : के. कविता यांची घोषणा- नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार; 2029ची विधानसभा निवडणूकही लढवणार

    सहा तास चर्चा करून सुद्धा सुप्रिया सुळे अपयशी; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादीचा राजीनामा!!

    फडणवीस सरकारचा निर्णय; नगराध्यक्षांना नगरपरिषदां मध्ये सदस्यत्व आणि मताचाही अधिकार; नेमका अर्थ काय??