विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करून ते वापरले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिल्यानंतर त्याचा आर्थिक लाभ झाल्याचे समोर आले आहे. देशाच्या तेल आयातीतल्या परकीय चलनात तब्बल 53894 कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळाले आहे बाकी अनुषंगिक फायदे झाले ते वेगळेच.Ethanol effect : Rs 53894 crore saved from oil import; Farmers got an additional income of Rs 40600 crore!
पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन म्हणून इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जेवरची वाहने याचा सरकार विचार करते आहे, इतकेच नाही तर त्याच्या उत्पादनाने विक्री आणि वापराला प्रोत्साहन देते आहे. परंतु त्या आधीचा टप्पा म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे सरकारने ठरविले. तसा कायदा केला आणि त्याचा आर्थिक लाभ आता समोर आला आहे
तो असा :
- इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करून तेल आयातीवर परकीय चलनात ₹53894 कोटींची बचत
- शेतकऱ्यांना ₹40600 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न
- 20% हायड्रोकार्बन उत्सर्जन कमी. ऊस, तुटलेले तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांमधून इथेनॉल काढले जात असल्याने कापणीनंतर साल जाळण्याचे प्रमाण कमी. प्रदूषणावर नियंत्रण.
- E-20 (20% इथेनॉल असलेले पेट्रोल) 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 84 पेट्रोल पंपांवर सध्या उपलब्ध
Ethanol effect : Rs 53894 crore saved from oil import; Farmers got an additional income of Rs 40600 crore!
- महत्वाच्या बातम्या
- नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??
- मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!
- मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!
- संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल?