वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील जनतेच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. महागाईच्या वणव्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्य जनतेला बसली आहे. हे कमी होते म्हणून की काय, आता त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संकटग्रस्त पाकिस्तानमध्ये पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे, सुझुकी मोटर्ससह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांचे प्लांट एकतर बंद केले आहेत किंवा उत्पादन कमी केले आहे.Escape of rich citizens from Pakistan As the country goes bankrupt, companies are locked, common people cry on the streets
या मोठ्या कंपन्यांचे प्लांट झाले बंद
आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान प्रत्येक दिवसेंदिवस लोकांवर संकटे आणत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक बड्या कंपन्यांनी देशातून माघार घेतली असून, त्यामुळे महागाईमुळे लोकांवर बेरोजगारीचे संकट वाढले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशन आणि जीएसकेसह अमरेली स्टील्स लिमिटेड, मिल्लत ट्रॅक्टर्स लिमिटेड, डायमंड इंडस्ट्रीज लिमिटेडसह अनेक कंपन्यांनी त्यांचे प्लांट बंद केले आहेत, ज्यामुळे उत्पादन खूप कमी झाले आहे.
औषधांच्या तुटवड्याचे संकट अधिक गडद
परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, कंपन्यांना गरजेचा मालही मिळत नाहीये. अहवालानुसार, सुझुकी मोटरच्या उत्पादन प्रकल्पातील काम 2 फेब्रुवारी रोजी ठप्प झाले, तर टायर-ट्यूब आणि औषधांशी संबंधित अनेक कंपन्यांनी कच्च्या मालाच्या आयातीतील समस्यांमुळे काम थांबवले आहे. औषध कंपन्यांचे काम ठप्प झाल्यामुळे लोकांना बेरोजगारीसोबतच आजारांवर उपचारासाठी औषधांचा मोठा तुटवडा जाणवू शकतो.
संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केली देशाची दिवाळखोरी
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला आहे आणि तो गेल्या आठवड्यातच 3 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला होता. देशाला या संकटातून बाहेर काढण्यात सरकारनेही पराभव स्वीकारला आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही हे मान्य केले आहे. पाकिस्तान आधीच दिवाळखोर झाला असून आपण दिवाळखोर देशात राहत आहोत, असे ते एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले. देशाच्या या स्थितीसाठी त्यांनी राजकीय नेत्यांसह लष्कर आणि नोकरशाहीवर निशाणा साधला.
देशात महागाईचा कडेलोट
देशातील महागाई 30 टक्क्यांच्या जवळ पोहोचली असून पीठ-डाळ-तांदूळ ते वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलपर्यंतच्या वस्तूंसाठी लोक भांडताना दिसत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचे संकट आणि शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बंद पडणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच दिसून आले आहे. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तू लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत, त्याशिवाय पाकिस्तानातील लाखो लोकांसमोर बेरोजगारीचे संकट गडद होऊ लागले आहे.
बेरोजगारीचा भस्मासूर
पाकिस्तानमध्ये बेरोजगारी वाढण्याची भीती बळावली आहे. मात्र, देशात आधीच रोजगारासाठी लढा सुरू असून याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उच्च न्यायालयात शिपाई पदासाठी 15 लाख अर्ज आले होते. अर्ज केलेल्यांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांचाही समावेश होता. इतकेच नाही तर याआधी 1667 कॉन्स्टेबल पदासाठी केवळ 30 हजार लोकांनी अर्ज केले होते आणि सर्वांना स्टेडियममध्ये परीक्षेसाठी बसवण्यात आले होते.
श्रीमंत नागरिकांचे पाकिस्तानातून पलायन
पाकिस्तानच्या बिघडलेल्या परिस्थितीच्या भीतीने आता लोक पाकिस्तान सोडून पळू लागले आहेत. पाकिस्तानातून परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. 2022 मध्ये 832,339 लोकांनी देश सोडला. 2016 नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये देश सोडून जाणाऱ्या पाकिस्तानींच्या संख्येत जवळपास 200% वाढ झाली आहे.
Escape of rich citizens from Pakistan As the country goes bankrupt, companies are locked, common people cry on the streets
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
- तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी
- मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल
- कोशियारींच्या मुलाखतीतले कळीचे सवाल; उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा कोण??,आणि….