• Download App
    एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय?? | Enjoy the Rep; Congress MLA Ramesh was slapped by Priyanka Gandhi but what about legal or partisan action ?

    एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एन्जॉय द रेप यासारखे वादग्रस्त वक्तव्य करून कर्नाटकचे वरिष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार राजकीयदृष्ट्या अडचणीत आले खरे, त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर त्यांनी जर – तरच्या भाषेत माफी मागितली खरी, पण तरी देखील काँग्रेसने अद्याप त्यांच्यावर पक्षीय अथवा कायदेशीर कारवाई केलेली दिसत नाही.Enjoy the Rep; Congress MLA Ramesh was slapped by Priyanka Gandhi but what about legal or partisan action ?

    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करून रमेश यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. एक वरिष्ठ लोकप्रतिनिधी असे असंवेदनशील वक्तव्य कसे करू शकतात? महिलांविषयी असले गलिच्छ उद्गार सहन केले जाणार नाहीत. महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. बलात्कार हा गर्हणीय गुन्हाच आहे. फुल स्टॉप…!!,असे या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.



    प्रियांका गांधी यांच्या ट्विटमधले “फुल स्टॉप” हे दोन शब्द म्हणजे रमेश यांच्यावर कारवाई होणार की त्यांच्या वक्तव्यावर फक्त टीकेची झोड उठवून पडदा पाडणार?, या विषयी शंका उत्पन्न झाली आहे.

    समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील रमेश यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. “लडकी हू, लढ सकती हूँ!!”, असे म्हणणार्‍या नेत्यांनी रमेश यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान स्मृती इराणी यांनी प्रियांका गांधी यांना दिले.

    त्यानंतर प्रियांका गांधी यांनी रमेश यांच्यावर टीका करणारे ट्विट केले. परंतु, अद्याप त्यांच्यावर कायदेशीर अथवा काँग्रेस पक्षीय दृष्टिकोनातून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांचे नुसतेच टीका करणारे ट्विट आहे की त्यापुढे जाऊन काँग्रेस पक्ष रमेश यांच्यावर कारवाई करणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    के. आर. रमेश कुमार हे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आमदार असून ते दोन वेळेला विधानसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत काँग्रेस मधून 13 आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये आले त्यावेळी रमेश हेच अध्यक्ष होते. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीने एन्जॉय द रेप सारखे गर्हणीय वक्तव्य करावे आणि काँग्रेसने त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करू नये, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    Enjoy the Rep; Congress MLA Ramesh was slapped by Priyanka Gandhi but what about legal or partisan action ?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे