विशेष प्रतिनिधी
बीड : Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील गुन्हेगारांना न्यायालयातून फाशीची शिक्षा होईपर्यंत वाट पाहण्यात थांबण्यापेक्षा अशा या फाळकुट दादांना भर चौकात गोळ्या घालून त्यांचे एन्काऊंटर करायला हवे. म्हणजे राज्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी डोके वर काढणार नाही. अशी मागणी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केज तालुक्यातील मस्साजोग येथे केली.Santosh Deshmukh
शुक्रवारी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, गुन्हेगारांना कोणीही राजाश्रय देऊ नये. या हत्या प्रकरणातील गुन्हेगार राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याने यावर त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले. तरीही राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखायला हवे. या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेतृत्व असून ते देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.
गुन्हेगारांच्या नातेवाईकांची चौकशी का नाही ?
सामान्य गुन्ह्यामध्ये पोलीस ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करतात. मात्र एवढ्या गंभीर गुन्ह्यात गुन्हेगारांच्या नातेवाईकांची देखील चौकशी व्हायला हवी. अशी मागणी ग्रामस्थांनी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
आश्विनी देशमुख यांना १० लाखाची शासकीय मदत सूर्पद
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कुटूंबीयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. शुक्रवारी १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
Encounter the accused in the Santosh Deshmukh murder case, shoot them in public, demands MLA Khot
महत्वाच्या बातम्या
- social media मुलांचे सोशल मीडिया अकाउंट पालकांच्या परवानगीने बनणार; कायद्याचा मसुदा 16 महिन्यांनंतर जारी
- पुण्यात सर्व सुविधायुक्त कर्करोग रुग्णालय, जागा उपलब्धतेसाठी माधुरी मिसाळ यांच्या सूचना
- मुंबईच्या धारावीत भीषण अपघात, टँकरची सहा कारला जोरदार धडक!
- Devendra Fadnavis : “अकेला देवेंद्र” म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीस आता “ऍक्टिव्ह” दिसले; पण हा “ऍक्टिव्हिजम” नेमका कुठे??