• Download App
    रोजगार चीनमध्ये आणि बाजारपेठ भारत चालणार नाही. केंद्र सरकारने इलॉन मस्क यांच्या टेस्लाला फटकारले|Employment in China and market India will not work. The central government slammed Elon Musk's Tesla

    रोजगार चीनमध्ये आणि बाजारपेठ भारत चालणार नाही. केंद्र सरकारने इलॉन मस्क यांच्या टेस्लाला फटकारले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टेस्ला कंपनीची बाजारपेठ ही भारत आहे. मात्र, ते चीनमध्ये रोजगार निर्माण करतात, असे असू शकत नाही. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनं बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली टेस्ला जोपर्यंत भारतातील उत्पादन कार्यात सहभागी होत नाही, तोपर्यंत त्यांना सवलती दिल्या जाणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी म्हटले आहे.Employment in China and market India will not work. The central government slammed Elon Musk’s Tesla

    इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी टेस्ला या कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, अवजड उद्योग मंत्रालयाने कंपनीला कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले.



    भारतात ऑटोमोबाईल आणि ऑटो इंडस्ट्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. याचसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत रसायनशास्त्र असलेल्या बॅटरींच्या निर्मितीसाठी आणखी वाव आहे.अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्णा पाल गुर्जर म्हणाले, कंपनीने सरकारच्या धोरणानुसार योजनांसाठी अद्याप अर्ज केलेला नाही.

    केंद्र सरकारच्या यासंदर्भात स्वत:च्या मोठ्या योजना देखील आहेत. या दोन्हींसाठी आवश्यक योजना भारतीय आणि परदेशी कंपन्यांसाठीही खुल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात टेस्ला कंपनीला इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी भारतीय बाजारपेठ हवी असेल, तर त्यांनी उत्पादन भारतात करावं, त्यासाठी आवश्यक संसाधनं पुरवली जातील .

    Employment in China and market India will not work. The central government slammed Elon Musk’s Tesla

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका