विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन केंद्रातल्या मोदी सरकारने अर्थसंकल्पाची परिभाषा बदलून ती सर्वसामान्य युवक महिला गरीब आणि शेतकरी वर्गाला आकर्षित करणारी केली आहे. युवकांसाठी केवळ व्यापारी वृत्तीच्या रोजगार निर्मिती कडे भर देण्यापेक्षा प्रत्यक्ष रोजगार आणि नोकरीनिर्मितीसाठी 2024 25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने विशेषत्वाने भर देऊन भरघोस तरतूद केली आहे. Employment, agricultural productivity, manufacturing among nine priorities outlined by government in Union Budget
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लोकांच्या हाताला काम प्रत्यक्ष नोकरी आणि रोजगार यावर भर दिला. शेतकरी, तरुण, व्यावसायिक यांना या बजेडकडून खूप अपेक्षा असताना मोदी सरकारने त्या पूर्ण केल्याची दिसत आहे.
अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलचा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी तरुणांसाठी रोजगारासंदर्भात 3 योजना जाहीर केल्या. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, 1 कोटी शेतकरी नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. 10 हजार जैविक केंद्र उभारले जाणार आहेत.
विकसित भारताला प्रथम प्राधान्य देणार तसेच तेल उत्पादक बियाणे आणि भाजीपाला उत्पादन वाढीसाठी मदत केली जाणार आहे. राज्य सरकारसोबत समन्वय साधणार आणि 6 कोटी शेतकऱ्यांचा डिजिटल सर्व्हे केला जाणार आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. रोजगार आणि स्किल डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
रोजगारासंदर्भातील 3 योजना
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात नोकऱ्या निर्माण केल्या जाणार आहेत. पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार असून ही योजना सर्व क्षेत्रांना लागू असेल.नवीन नोकरी करणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांना लाभ मिळणार आहे.
ईपीएफओ रजिस्टर झाल्यानंतर 50000 रुपयांचा इंसेन्टिव्ह मिळणार आहे.
उत्पादन वाढीसाठी शेतीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सरकार आणि खासगी संस्थांकडून नवीन रिसर्च केला जाणार आहे. ईपीएफओसह फर्स्ट टाईम नोकरी करणाऱ्यांचाही डेटा गोळा केला जाणार आहे. नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची व्यवस्था करण्यात येईल. त्या कर्जावर 3 % सवलत देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांना ई व्हाउचर्स दिले जाणार आहेत.
नव्या रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद केली जाणार आहे.
1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देण्यात येणार आहे.
Employment, agricultural productivity, manufacturing among nine priorities outlined by government in Union Budget
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!