मस्क यांनी ‘X’ जाहिरात महसूल दान करणार असल्याची घोषणा केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. गाझा पट्टीत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे संकट आहे. तेथे सातत्याने मानवतावादी मदत पोहोचवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता इलॉन मस्कही लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. Elon Musk will give huge aid to Israeli hospitals and victims in the Gaza Strip
सोशल मीडिया साइट X चे मालक इलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे की ते X वरील जाहिरातींमधून मिळणारा महसूल युद्धग्रस्त गाझा पट्टीतील पीडितांसाठी आणि इस्रायलमधील रुग्णालयांना देतील.
इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, “X कॉर्पच्या जाहिराती आणि युजर्सद्वारे मिळणारा रेव्हेन्यू गाझा पट्टीतील युद्ध पीडितांना आणि गाझामधील इस्त्रायली रुग्णालय व रेड क्रॉस, क्रिसेंकटला दान करेल.
इस्त्रायली संरक्षण दल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान मस्क यांनी ही घोषणा केली आहे. इस्त्रायली हल्ल्यांमुळे गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 13,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.
Elon Musk will give huge aid to Israeli hospitals and victims in the Gaza Strip
महत्वाच्या बातम्या
- डीपफेक’ व्हिडीओवर सरकारने बोलावली उच्चस्तरीय बैठक
- राहुल गांधी गाढे अभ्यासू ज्योतिषी आहेत हे समस्त भारतीयांना माहिती नव्हते, ते कालच समजले!!
- ED फुल्ल स्विंग मध्ये, नॅशनल हेराल्ड पाठोपाठ BYJU’S वर कारवाई; 9362.35 कोटी रुपयांसंदर्भात नोटीस!!
- नॅशनल हेरॉल्ड केस मध्ये ED चा गांधी परिवाराला जबरदस्त दणका; तब्बल 751.9 कोटींची मालमत्ता जप्त!!
- निवडणूक असलेल्या 5 राज्यांतून 1760 कोटी रुपयांची दारू आणि रोख जप्त; 2018च्या तुलनेत 7 पट जास्त