जाणून घ्या निवडणुणकीचे सविस्तर वेळापत्रक
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मंगळवारी (२७ जून) गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या दहा जागांवर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीशी संबंधित माहिती जाहीर केली आहे. यानुसार २४ जुलै रोजी सर्व १० जागांवर मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. Election for 10 Rajya Sabha seats on July 24
तीन राज्यांतील १० राज्यसभेच्या जागांचे सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या जागांवर निवडणूक होणार आहे. जाणून घेऊया त्या सदस्यांची नावे ज्यांचा कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संपणार आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ संपणार –
विनय तेंडुलकर (गोवा), दिनेशचंद्र जेमलभाई अनावडिया (गुजरात), जुगलसिंग माथूर (गुजरात), एस जयशंकर (गुजरात), डेरेक ओब्रायन (पश्चिम बंगाल), डोला सेन (पश्चिम बंगाल), प्रदीप भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), सुष्मिता देव (पश्चिम बंगाल), शांता छेत्री (पश्चिम बंगाल), सुखेंदू शेखर रे (पश्चिम बंगाल)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक –
अधिसूचना जारी करण्याची तारीख – १३ जुलै, नावनोंदणीची अंतिम तारीख – १४ जुलै, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – १७ जुलै, मतदानाची तारीख – २४ जुलै, मतदानाची वेळ – सकाळी ९ ते दुपारी ४, मतमोजणीची तारीख – २४ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपासून.
Election for 10 Rajya Sabha seats on July 24
महत्वाच्या बातम्या
- ‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि…’’ फडणवीसांचा थेट निशाणा!
- फडणवीसांचे पवारांना प्राथमिक शाळेतले “धडे”; “वासुनाका”कार भाऊ पाध्येंचे वाचा बोल खडे!!
- ‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!
- मणिपूर मधल्या हिंसाचाराचे मूळ कारण काँग्रेसचेच फूटपाडे धोरण; राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात स्थानिक नेत्याचा आरोप