Election Commission : भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेत चार राज्यांमधील पोटनिवडणुका तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना महामारीच्या संकटाने उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने म्हटले की, परिस्थिती सुधारल्याशिवाय पोटनिवडणुका घेण्यात येणार नाहीत. या पोटनिवडणुका कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रस्तावित आहेत. Election Commission’s cautious stance on Corona crisis, by-polls in four states postponed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेत चार राज्यांमधील पोटनिवडणुका तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना महामारीच्या संकटाने उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने म्हटले की, परिस्थिती सुधारल्याशिवाय पोटनिवडणुका घेण्यात येणार नाहीत. या पोटनिवडणुका दादरा नगर हवेली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रस्तावित आहेत.
तत्पूर्वी, मद्रास हायकोर्टाने कोरोना संसर्गाच्या प्रसारासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवत तीव्र शब्दांत कानउघाडणी केली होती. राजकीय पक्ष प्रचारसभा घेत होते तेव्हा तुम्ही काय परग्रहावर होता काय? असा सवालही केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना महामारीच्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्या पाच राज्यांतील निवडणूक कालावधीत नोंद झाली होती. यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंसाठ निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, असेही कोर्टाने म्हटले होते.
आता मात्र निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेत चार राज्यांतील पोटनिवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
Election Commission’s cautious stance on Corona crisis, by-polls in four states postponed
महत्त्वाच्या बातम्या
- Bengal Violence : ‘ममतांचे हात रक्ताने माखलेले, मृत्यूच्या भयाने बंगालमधून एक लाख लोकांचे घर सोडून पलायन’ – जेपी नड्डांचा आरोप
- मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींना झाली कोरोनाची आठवण, बंगालमध्ये लावला मिनी लॉकडाऊन
- Maratha Reservation : गुणरत्न सदावर्ते म्हणाले- मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जिवे मारलं, तर शरद पवार, सुप्रिया सुळे अन् मराठा संघटना जबाबदार!
- लखनऊमध्ये ऑक्सिजन रिफिलिंगदरम्यान मोठा स्फोट, तीन जणांचा मृत्यू, पाच गंभीर
- Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आता राज्याने व केंद्राने मिळून मार्ग काढावा, खा. संभाजीराजेंचे आजी व माजी मुख्यमंत्र्यांना पत्र