• Download App
    धर्माच्या आधारावर प्रचार करणे ममतांना भोवले; निवडणूक आयोगाची ममतांवर उद्या रात्री ८.०० पर्यंत प्रचारबंदी Election Commission of India imposes a ban of 24 hours on West Bengal Chief Minister Mamata Banerjee

    धर्माच्या आधारावर प्रचार करणे ममतांना भोवले; निवडणूक आयोगाची ममतांवर उद्या रात्री ८.०० पर्यंत प्रचारबंदी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर बंदी घातली आहे. Election Commission of India imposes a ban of 24 hours on West Bengal Chief Minister Mamata Banerjee

    ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांना भाजपचा पराभव करण्यासाठी एकजूटीने तृणमूळ काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले होते. पश्चिम बंगालमधले फुर्फुरा शरीफचे मौलवी अब्बासी आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे भाजपची बी टीम आहे. भाजपकडून पैसे घेऊन ते मुसलमानांची मते फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मतदान करणे म्हणजे तृणमूळ काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपला मदत करण्यासारखेच आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभांमध्ये केला होता.

    त्यांच्या भाषणांविरोधात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने ममतांच्या भाषणाची छाननी करून त्यांच्या प्रचारावर २४ तासांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत त्यांना प्रचारात भाग घेता येणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

    Election Commission of India imposes a ban of 24 hours on West Bengal Chief Minister Mamata Banerjee

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र