• Download App
    मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका | Election commission issued notice to mamta banerjee

    मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेदरम्यान मुस्लिम मतदारांना केलेल्या आवाहनावरून निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. Election commission issued notice to mamta banerjee

    वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ममतांना नोटीस बजावली आहे. ममतांना उत्तर देण्यासाठी ४८ तासांच्या आत म्हणजे दोन दिवसांचा अवधी दिला आहे.
    तीन एप्रिलला एका प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जींकडून स्पष्टीकरण मागितले आहे. वेगवगेळ्या राजकीय पक्षांमध्ये आपल्या मतांचं विभाजन होऊ देऊ नका, असं आवाहन ममतांनी मुस्लिमांना केलं होतं.



    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी एक निवडणूक प्रचारसभा घेतली. या सभेत ममतांनी मुस्लिम मतदारांना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम आणि अब्बास सिद्दीकी यांच्या इंडियन सेक्यलर फ्रंट ऐवजी तृणमूल काँग्रेसला एकजूट होऊन मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर टीका केली. हिंदू-मुस्लिम असे करत ममतांनी मते मागितल्याचा आरोप मोदींनी केला होता.

    Election commission issued notice to mamta banerjee

    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    Airlines : सीटवर अतिरिक्त शुल्क न आकारण्यावर विमान कंपन्यांचा विरोध; म्हटले- विमान भाडे वाढवावे लागेल

    TMC Manifesto : ममतांची घोषणा- SC-ST महिलांना दरमहा ₹1700, इतरांना ₹1500 मिळणार, जाहीरनाम्यात पक्क्या घरांचे आश्वासन

    Air India : एअर इंडियाने दिल्लीहून कॅनडाला चुकीचे विमान पाठवले; 7 तासांनंतर चीनच्या हवाई हद्दीतून परतले