• Download App
    निवडणूक निकालानंतर मिरवणुकीवर बंदी, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर निवडणूक आयोगाची कठोर भूमिका, वाचा सविस्तर... । Election Commission Bans Victory rally After Vote Counting On 2nd May in Five States Election

    निवडणूक निकालानंतर मिरवणुकीवर बंदी, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर निवडणूक आयोगाची कठोर भूमिका, वाचा सविस्तर…

    Election Commission : मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना नियमावलीवरून कठोर भूमिका घेतली आहे. २ मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत आयागोने आदेश काढले आहेत. मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. निकालानंतर कोणताही उमेदवार आपले विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ दोनच लोकांसह जाऊ शकतो. Election Commission Bans Victory rally After Vote Counting On 2nd May in Five States Election


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना नियमावलीवरून कठोर भूमिका घेतली आहे. २ मे रोजी येणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत आयागोने आदेश काढले आहेत. मतमोजणीच्या वेळी किंवा निकालानंतर कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे त्यात नमूद केले आहे. निकालानंतर कोणताही उमेदवार आपले विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ दोनच लोकांसह जाऊ शकतो.

    तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी येत आहेत. बंगालमध्ये ७ टप्प्यांतील मतदान झाले आहे. अखेरच्या ८व्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. उर्वरित राज्यांतील निवडणुकीचे मतदान यापूर्वीच पार पडले आहे.

    नियम मोडल्यास मतमोजणी रोखण्याचा कोर्टाचा इशारा

    कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला फटकारले होते. मुख्य न्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. २ मे रोजी मतमोजणी दिवसासाठी कोविड प्रोटोकॉल बनवून त्याचे अनुसरण करण्याचे त्यांनी आयोगाला बजावले. जर तसे झाले नाही तर आम्ही मतमोजणी बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोर्ट असेही म्हणाले होते की, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये. जेव्हा मोठमोठ्या सभा घेतल्या जात होत्या, तेव्हा आयोग काय परग्रहावर होता काय?, असा सवालही कोर्टाने उपस्थित केला होता.

    मतमोजणीसंदर्भात हायकोर्टाच्या सूचना

    • मतमोजणीच्या दिवशी कोरोना नियमावली लागू झाल्याची खात्री करा.
    • मोजणीचा दिवस कोणत्याही परिस्थितीत राजकीय किंवा अराजकीय कारणांमुळे कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरता कामा नये.
    • एकतर मतमोजणी योग्य पद्धतीने व्हावी किंवा टाळावी.
    • लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. प्रशासनाला याची आठवण करून देणे त्रासदायक आहे.
    • जर लोक जिवंत राहिले, तरच ते या लोकशाही प्रजासत्ताकात मिळालेल्या हक्कांचा वापर करू शकतील.
    • आजची परिस्थिती जिवंत राहण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्याची आहे, इतर सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

    दरम्यान, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भयंकर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या सभांमध्ये गर्दीबाबत सतत प्रश्न उपस्थित केले जात होते. बंगालमधील ७व्या टप्प्यातील मतदानाआधी निवडणूक आयोगाने मोठे मोर्चे, रोड शो आणि पदयात्रेला बंदी घातली होती. राजकीय पक्षांना व्हर्च्युअल सभा घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

    Election Commission Bans Victory rally After Vote Counting On 2nd May in Five States Election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य