• Download App
    हौद से गई, वह बूंद से आयी; राष्ट्रवादीच्या घड्याळाला कर्नाटक पुरती परवानगी!!|Election commission allow NCP to contest assembly elections on clock symbol in karnataka

    हौद से गई, वह बूंद से आयी; राष्ट्रवादीच्या घड्याळाला कर्नाटक पुरती परवानगी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : “हौद से गई वो बूंद से नही आती”, ही हिंदीतली कहावत आहे. पण राष्ट्रवादीसाठी हीच कहावत उलटी झाली आहे. “हौद से गई वह बूंद से आयी”, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळ्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्यातरी कर्नाटक पुरती मान्यता देऊन टाकली आहे.Election commission allow NCP to contest assembly elections on clock symbol in karnataka

    राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाच्या राजकीय परफॉर्मन्स नुसार आणि नियमानुसार काढून घेतला. राष्ट्रवादीला महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला. त्यामुळे पक्षाला घड्याळ या चिन्हावर फक्त महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची मूभा राहिली आहे. त्यामुळे कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या नव्या चिन्हावर निवडणूक लढवणार??, हा प्रश्न तयार झाला होता. मात्र हा प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवून टाकला आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीपुरती राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवायला परवानगी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन पक्षाला तशी परवानगी दिली आहे. अर्थात यामध्ये कर्नाटकात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर बाकी कोणत्याही पक्षाने दावा सांगितला नसल्याने निवडणूक आयोगाला हा निर्णय घेणे शक्य झाले.



    अर्थात, कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस ज्या 45 जागा लढवणार आहे, त्याच जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घड्याळ चिन्ह बहाल केले जाईल. पण त्या पलीकडे ते 45 मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघांमध्ये जर कोणा पक्षाच्या उमेदवाराने अथवा अपक्ष उमेदवाराने घड्याळ चिन्ह मागितले तर ते चिन्ह बहाल करण्याची निवडणूक आयोगाला मूभा राहील.

    पण काही का होईना, राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर निवडणूक आयोगाने कर्नाटक पुरती घड्याळाला परवानगी देऊन राष्ट्रवादीची हौद से गेलेली राजकीय प्रतिष्ठा बूंद ने परत दिली आहे, हे मात्र नक्की!!

    Election commission allow NCP to contest assembly elections on clock symbol in karnataka

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा