महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल, असेही म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची श्रीनगर येथे भेट घेतली. ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी श्रीनगर येथे जागा देण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते. Eknath Shindes request to Jammu and Kashmir Governor for land for Maharashtra Bhavan in Srinagar
राज्यपालांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले आहे की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे ‘महाराष्ट्र भवन’ केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल.
जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे.
Eknath Shindes request to Jammu and Kashmir Governor for land for Maharashtra Bhavan in Srinagar
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ‘आप’ची मेगा रॅली, रामलीला मैदानावर 1 लाख लोक हजर राहणार असल्याचा दावा
- अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना तिहेरी तलाक, राम मंदिरावर प्रश्न विचारत साधला निशाणा, म्हणाले…
- मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार
- द केरला स्टोरी नंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.