• Download App
    Eknath Shinde बिहारमध्ये नड्डा यांच्या समवेत एकनाथ शिंदेंचा प्रचाराचा डंका; NDA च्या रेकॉर्डब्रेक सभा

    बिहारमध्ये नड्डा यांच्या समवेत एकनाथ शिंदेंचा प्रचाराचा डंका; NDA च्या रेकॉर्डब्रेक सभा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA ने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे. बिहार पुन्हा त्या काळात जाऊ नये, म्हणून आगामी निवडणुकीत एनडीएच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील बाकरपूर विधानसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंह यांच्या प्रचार सभेत बोलताना स्थानिक मतदारांना केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या समवेत त्यांनी प्रचाराचा धडाका लावला. Eknath Shinde

    एनडीए मधील पाच घटक पक्ष हे पाच पांडव असून, विरोधक म्हणजे कौरव आहेत, त्यामुळे आता निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर या कौरवांचा संहार करा, असे सांगत यावेळी विरोधकांवर हल्ला चढवला.



    जे vote chori चा आरोप करतात, त्यांनी त्यांच्या राजकारणात नोट चोरी केली आहे. काँग्रेसने नेहमीच देशाची फसवणूक केली आणि आता हार पत्करण्याची तयारी करत आहेत. जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे थियरीत पास, पण प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेत, असे हे लोक आज इतरांना राजकारण शिकवत फिरत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.

    एनडीए सरकारने मागील काही वर्षांत बिहारमध्ये अब्जावधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना गती दिली आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक कल्याण योजनांवर भर देण्यात आला. महिलांसाठीच्या ‘लाडली योजना’, सामाजिक सुरक्षा व आत्मनिर्भरतेच्या उपक्रमांमुळे बिहारमधील महिलांना नवे बळ मिळाले असल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले. त्यामुळे बिहारला विकासाच्या मार्गावर घेऊन जायचे तर पुन्हा एकदा राज्यात डबल इंजिन सरकारला संधी द्यावी लागेल असे याप्रसंगी नमूद केले.

    यावेळी भाजपचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जे.पी.नड्डा, अजय यादव, वीरेंद्र पटेल, बाबू साहेब, पप्पू कुशवाहा, रमेश पासवान, श्रीमती प्रभावती देवी, नागेंद्र मिश्र, संजय कुमार सिंह तसेच एनडीए मधील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि बिहारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Eknath Shinde’s campaigning with Nadda in Bihar is a nightmare

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Hamid Ansari : माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांनी गझनवीला भारतीय लुटारू म्हटले; भाजपने म्हटले- ही विकृत मानसिकता, काँग्रेसला गझनवीच्या 17 हल्ल्यांवर पांघरूण घालायचे आहे का?

    सुनेत्रा पवारांच्या निर्णयातून शरद पवार “नॉन प्लस”; आपल्याला विचारले नसल्याची त्यांचीच कबुली!!; पवारांनी “डाव” टाकण्यापूर्वीच निर्णय!!

    Chairman CJ Roy : आयकरच्या छाप्यावेळी उद्योजकाची आत्महत्या; कॉन्फिडेंट ग्रुपच्या चेअरमनची 9000 कोटींची मालमत्ता