प्रतिनिधी
मुंबई : सनातन धर्माला मलेरिया, डेंगी आणि कोरोना अशी नावे ठेवून त्याच्या निर्मूलनाची बेलगाम वक्तव्य करणाऱ्या तामिळनाडूचा मंत्री उदयनिधी स्टालिन याच्यावर चोहोबाजूंनी सहभागी प्रखर हल्ले होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उदय निधी स्टालिन यांच्या वक्तव्याचा जबरदस्त निषेध केला आहे. eknath shinde to uday stalin about sanatam dharma
या संदर्भातले ट्विट एकनाथ शिंदे यांनी करून उदयनिधीला “दिवटा” मुलगा असे संबोधले आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट असे :
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या “दिवट्या” मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टालिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल.
पण स्टालिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे. हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही, तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे “इंडी” आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेंचे “उद्योग” बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टालिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.
आज “इंडी” आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.
eknath shinde to uday stalin about sanatam dharma
महत्वाच्या बातम्या
- “तो” परत आला; विदर्भात बरसला!!; विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट!!
- भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित, उत्तर प्रदेशातून ‘या’ दिग्गज नेत्याला दिली उमेदवारी!
- ”सत्तेसाठी ‘INDIA’ आघाडी सनातन धर्म नष्ट करू पाहत आहे” अमित शाहांचा घणाघात!
- सनातन धर्माला मलेरिया, डेंगीचे लांछन लावणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचा “ताप” तहसीन पूनावालांनी उतरवला!!