नाशिक : नाराज बिराज काही नाही एकनाथ शिंदेही तेवढेच “तयार”; भाजपला जे जमले नाही ते करून दाखविणार!!, राजकीय चित्र एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून समोर आले. एकनाथ शिंदे भाजप वर नाराज असल्याच्या बातम्यांचे ढोल मराठी माध्यमांनी भरपूर पिटले. त्यात शिंदे – फडणवीस यांच्यात मतभेद झाल्याच्या तडका टाकून बातम्या दिल्या. एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटणार इथपर्यंत मराठी माध्यमांची मजल गेली. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही उलट एकनाथ शिंदेही तेवढेच “तयार” निघाले. त्यांनी आपल्या पद्धतीने ठाणे आणि मुंबईतले राजकारण पुढे रेटले. त्यांनी भाजपला replace करू शकेल अशी शिवशक्ती – भीमशक्ती युती केली. Eknath Shinde
भाजपने आत्तापर्यंत अनेक नेत्यांना “गुंडाळले”. त्यांच्याबरोबर युत्या – आघाड्या केल्या. त्यामध्ये अगदी मायावतींचा देखील समावेश राहिला. पण भाजपला कुठल्या आंबेडकर गटाबरोबर किंवा रिपब्लिकन पक्षाबरोबर जुळवून घेणे जमले नाही. किंवा प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांना गुंडाळणे जमले नाही. कुठल्याही भीमशक्तीने भाजपशी कधी उघडपणे समझोता केला नाही. महाराष्ट्रातल्या भीमशक्तीने आपला संघ विरोध कायम ठेवला. संघ आणि भाजपला नेहमीच भीमशक्तीला जवळ घ्यावेसे वाटले त्यांनी भीमशक्तीचा अनुनय करायचा सुद्धा प्रयत्न केला पण संघ आणि भाजपला ते जमले नाही. महाराष्ट्रातल्या भीमशक्तीने संघ आणि भाजपला आपल्या नादी लावून घेतले नाही. Eknath Shinde
महाराष्ट्रातल्या भीमशक्तीने काँग्रेसला विरोध करून छुप्या पद्धतीने भाजपला जी काही मदत करायची, ती केली. पण त्या पलीकडे भाजपला हवी तशी कधीच मदत केली नाही.
– शिवशक्ती – भीमशक्ती युती
पण ही किमया बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी मात्र ठाण्यात करून दाखविली. बाळासाहेबांच्या स्वप्नातली शिवशक्ती भीमशक्ती युती ठाण्यात झाली. तिचे पडसाद मुंबईत सुद्धा उमटले.
रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिन सोहळा ठाण्यातील शिवाजी मैदानात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक्ती भीमशक्तीचे अनोखे दर्शन पहायला मिळाले. या सोहळ्याला एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२५ वर्षांपूर्वी याच ठाण्यात वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि रिपब्लिकन_सेना यांची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.
– अटी – शर्तींशिवाय शिवसेनेची युती
आनंदराज आंबेडकर यांनी कुठल्याही अटीशर्ती न ठेवता शिवसेनेशी युती केली. माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती. ही युती सत्तेसाठी नाही, तर दलित, वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झाली असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं. त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलासुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते हे सिद्ध झाले.
त्यामुळेच शेतकऱ्याचा मुलगा असूनही मी राज्याचा मुख्यमंत्री तर नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान बनू शकले हीच संविधानाची ताकद असल्याचे याप्रसंगी सांगितले.
बाबासाहेबांच्या कार्याची जपणूक आणि गौरव करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. इंदू मिल येथील स्मारकाचे काम वेगाने सुरू असल्याचे यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्र भूषण राम सुतार या स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा लवकरच उभारणार असल्याचेही याप्रसंगी जाहीर केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, युवा नेते ॲड.अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधणकर, बाळासाहेब ओव्हाळ, सुनील वाघेकर आणि रिपब्लिकन सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Eknath Shinde makes Shiv Shakti – Bheem Shakti yuti to counter BJP
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या पायात मनसेचा खोडा; शरद पवारांचा डाव काँग्रेसने बरोबर ओळखला!!
- Ludhiana :लुधियानामध्ये दहशतवाद्यांचा एन्काउंटर, एकाला 3, तर दुसऱ्याला 1 गोळी लागली, PAK टेरर मॉड्यूलशी कनेक्शन
- Robert Vadra, : मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; ईडीने युकेस्थित संजय भंडारींशी संबंधित प्रकरणात आरोपी केले
- श्री भगवान सत्य साईबाबांनी मानवसेवा हाच खरा धर्म मानला; जन्मशताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा वाटप