• Download App
    Eknath Shinde विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात कठोर भूमिका घ्या; दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदेंचे शिवसेना खासदारांना आदेश

    विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात कठोर भूमिका घ्या; दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदेंचे शिवसेना खासदारांना आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विरोधकांनी कुठलेही खोटे नॅरेटिव्ह पसरविले, तर त्या विरोधात कठोर भूमिका घ्या, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिल्ली भेटीत शिवसेनेच्या खासदारांना दिले. Eknath Shinde

    नवी दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन शिवसेना खासदारांची काल महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

    या बैठकीत अधिवेशनातील विविध कामकाज, अर्थसंकल्पावरील चर्चा तसेच देशासमोरील सध्याच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    इंधन टंचाईवर चर्चा

    सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि पुरवठा साखळीशी संबंधित आव्हानांवरही यावेळी विचारमंथन झाले. देशहित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या धोरणांना भक्कम पाठिंबा देण्याची भूमिका या बैठकीत स्पष्ट केली.



    खोटे नॅरेटिव्ह हाणून पाडा

    यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसेना खासदारांना मार्गदर्शन करताना अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे आणि विरोधकांकडून पसरविल्या जाणाऱ्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले.

    शिवसेना हा एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असून, संसदेत आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

    यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.

    Eknath Shinde Issues Directives to Shiv Sena MPs in Delhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!