प्रतिनिधी
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस मध्ये ईडीच्या नोटिसा चौकशा, ऑफिस सील वगैरे करून नक्की कोण कुणाला घाबवरतेय की कोण कोणाला घाबरत आहे? असे प्रश्न पडले आहेत. कारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या बोलण्यामध्ये ही विसंगती दिसून येत आहे. ED Who exactly is afraid of whom? Or scare? Congress or BJP
मोदींना घाबरत नाही : राहुल गांधी
संसदेच्या लॉबीत भरभर चालत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी, काय करायचे ते करा मी मोदींना घाबरत नाही. आमच्या घराभोवती बॅरिकेट्स लावून तुम्ही सत्य लपवू शकत नाही, अशा शब्दात मोदींना आव्हान दिले, तर दुसरीकडे राज्यसभेत बोलताना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच काँग्रेसला घाबरत असल्याचा वार केला. सरकार काँग्रेसला घाबरत असल्यामुळे ईडीच्या कारवाया करून आमच्यासारख्या नेत्यांना घाबरवायचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही डरणारी माणसे नाही. आम्ही लढणारी माणसे आहोत, असे सांगून मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार शरसंधान साधून घेतले. संसदेचे अधिवेशन चालू असताना ईडीने माझ्यासारख्या खासदाराला समन्स पाठवले आहे. मी कायद्याचा आदर करतो पण म्हणून संसदेचे अधिवेशन सुरू असताना एका खासदार आला समन्स पाठवून बोलवून घेणे याचा नेमका अर्थ काय? हे घाबरवण्यासाठी चालले आहे ना?, असा सवाल त्यांनी केला.
मोदी सरकार काँग्रेसला घाबरते : खर्गे
एकीकडे राहुल गांधी हे आपण मोदींना घाबरत नसल्याचे म्हणाले, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे हे मोदी सरकार काँग्रेसला घाबरत असल्याचे म्हणाले आहेत. म्हणूनच नेमके कोण कोणाला घाबरते आहे? की घाबरवते आहे?, हा प्रश्न पडला आहे.
पियुष गोयलांचे प्रत्युत्तर
तिसरीकडे राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीच्या समन्स मध्ये सरकारचा कोणताही हात नाही. ती कायदेशीर प्रक्रिया आहे. सध्याचे सरकार कोणत्याही तपास संस्थेत हस्तक्षेप करत नाही. त्यांच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात तपास संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप होत असेल, असा टोला पियुष गोयल यांनी लगावला आहे. पण राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरागे यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे मात्र ईडीच्या कारवाया हा विषय राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चेचा ठरला आहे.
ED Who exactly is afraid of whom? Or scare? Congress or BJP
महत्वाच्या बातम्या
- अतिश्रम झाल्याने एकनाथ शिंदेंना डॉक्टरांचा आरामाचा सल्ला; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना!!
- नॅशनल हेराल्ड केस : सलग दुसऱ्या दिवशी ईडीची कारवाई, यंग इंडियाचे ऑफिस सील; राहुल कर्नाटक दौरा सोडून दिल्लीला परतले
- ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची संजय राऊतांची तक्रार; पण राऊतांच्या एसी ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ!!
- शिंदे – ठाकरे सत्तासंघर्षावर दोन्ही बाजूंचे सुप्रीम कोर्टात “हे” झाले युक्तिवाद!!