• Download App
    बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला 'ED'ने पाठवले समन्स, जाणून घ्या, कोणत्या प्रकरणात आहे आरोप? ED sent summons to Bollywood star Ranbir Kapoor

    बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ‘ED’ने पाठवले समन्स, जाणून घ्या, कोणत्या प्रकरणात आहे आरोप?

    ईडीने रणबीर कपूरला ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. 

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर अडचणीत सापडला आहे. वास्तविक, ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात त्याला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स प्राप्त झाले आहेत.  या समन्समध्ये ईडीने रणबीर कपूरला ६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.  ईडी आणखी अनेक चित्रपट कलाकारांना समन्स पाठवू शकते, अशीही बातमी आहे. ED sent summons to Bollywood star Ranbir Kapoor

    या प्रकरणात रणवीर कपूरचेही नाव पुढे आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हे समन्स रणबीर कपूरला चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी १४ बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली आहेत. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

    ‘महादेव गेमिंग-बेटिंग’ हे सट्टेबाजीचे अॅप आहे. सौरभ चंद्राकर हे त्याचे प्रवर्तक आहेत. चंद्राकरचे यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झाले. हे लग्न संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्नाला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. शिवाय या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. कारण यासाठी 200 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. लग्नाचा व्हिडिओ भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यानंतर लग्नात परफॉर्म करण्यासाठी गेलेले चित्रपट कलाकार आता ईडीच्या निशाण्यावर आहेत.

    ED sent summons to Bollywood star Ranbir Kapoor

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पत्नी मोलकरीण नाही, जीवनसाथी आहे:घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले – जेवण न बनवणे क्रूरता नाही, घरकाम पतीचीही जबाबदारी

    ECI : निवडणुकीच्या जाहिरातींसाठी पक्षांना प्रमाणपत्र घ्यावे लागेल; निवडणूक आयोगाचे निर्देश

    LPG Tankers : द फोकस एक्सप्लेनर : देशाला दरमहा ३० LPG टँकरची गरज; त्यापैकी ६ होर्मुझमध्ये अडकले, गॅस पुरवठ्याचे पुढे काय?