माजी आमदारांच्या कंपनीवर मनी लाँड्रिंगचा आरोप
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 750 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले. बँक कर्ज घोटाळ्यात मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे. गंगोत्री एंटरप्रायझेस नावाच्या कंपनीशी संबंधित असलेल्या जागेवर ईडीने छापे टाकले आहेत. या कंपनीचे प्रवर्तक यूपीचे माजी आमदार विनय शंकर तिवारी, रिता तिवारी आणि अजित पांडे आहेत.ED raids in many states in bank loan scam case
विनय शंकर तिवारी हा यूपीचे दिवंगत नेते हरिशंकर तिवारी यांचा पुत्र आहेत. विनय शंकर तिवारी गोरखपूरच्या चिल्लुपार मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर निवडून आले होते, पण नंतर ते सपामध्ये दाखल झाले.
गंगोत्री एंटरप्रायझेसने 2012-2016 दरम्यान अनेक बँकांच्या संघाकडून सुमारे 750 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. बँकांच्या संघाचे नेतृत्व बँक ऑफ इंडिया करते. या घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी ईडीने लखनऊ, गोरखपूर आणि यूपीच्या नोएडामध्ये छापे टाकले. याशिवाय, अहमदाबाद, गुजरात आणि गुरुग्राम, हरियाणा येथेही छापे टाकण्यात आले.
गंगोत्री एंटरप्रायझेस रस्ते बांधणी, टोल प्लाझा ऑपरेशन आणि इतर सरकारी करारांशी संबंधित आहे. ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या प्रकरणात सुमारे 72 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.
ED raids in many states in bank loan scam case
महत्वाच्या बातम्या
- राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला
- ममतांशी मतभेदांचा गंभीर परिणाम; अशोक चव्हाणांनंतर अधीर रंजन चौधरी देखील भाजपच्या वाटेवर??
- मैतेईंना ST दर्जा देण्यावर विचार होणार नाही; मणिपूर हायकोर्टाने निर्णयातील वादग्रस्त उतारा हटवला
- अनियंत्रित कार दुभाजकाला धडकली, बीआरएस महिला आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू