वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील 28 प्रमुख बॅंकांकडून तब्बल 22 हजार 482 कोटींचे कर्ज घेऊन, हे पैसे 100 बनावट कंपन्यांद्वारे फिरवून त्यातून वैयक्तिक मालमत्ता निर्माण केल्या प्रकरणी सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने जहाज बांधणी क्षेत्रातील एबीजी शिपयार्ड कंपनीच्या मुंबई, पुणे, सुरतसह एकूण 26 कार्यालयांवर मंगळवारी छापे घातले. यात मुंबईमधील 24 ठिकाणांचा समावेश आहे. एबीजी कंपनी सध्या दिवाळखोर आहे. ED Raids: ED raids ABG Shipyard, country’s largest private shipping company in Rs 22000 crore scam !!
28 बॅंकांच्या एकत्रित गटाने कंपनीला सन 2005 ते 2012 या कालावधीमध्ये 22 हजार 842 रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र कंपनीचे अध्यक्ष व अन्य संचालकांनी कर्जापोटी प्राप्त झालेली ही रक्कम 100 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देशात आणि परदेशात फिरवत त्याद्वारे वैयक्तिक मालमत्ता उभी केली. 7 फेब्रुवारी 2022 रोजी सीबीआयने या कंपनीवर एफआयआर दाखल केला. त्याच आधारे ईडीने छापे घालून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. कर्जापैकी किती रक्कम कुठे व कशी वळवली, या बनावट कंपन्या कशा स्थापन केल्या, त्यात कोणत्या संचालकाची काय भूमिका होती, याचा तपास सुरू आहे.
कंपनी दिवाळखोर
एबीजी शिपयार्ड या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहे. देशातील सर्वात मोठी खासगी जहाज बांधणी कंपनी, अशी ओळख होती. अलिकडेच कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे.
ED Raids : ED raids ABG Shipyard, country’s largest private shipping company in Rs 22000 crore scam !!
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदू मतदारांवर चालून आलेली “गदाधारी” आणि “गधास्वारी” हिंदुत्वाची संक्रांत!!
- धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश
- धार्मिक हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी फेटाळली
- तामीळनाडूतही राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री संघर्ष, कुलगुरूंच्या नियुक्तीचे अधिकार तामिळनाडू सरकारने घेतले स्वत : कडे
- भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी अरुंधती रॉयपासून अनेकांना मिळते पाकिस्ताकडून मदत, अमेरिकेतील संस्थेच्या अहवालात झाले उघड