• Download App
    ED raids दिल्लीत EDची ३७ ठिकाणी छापेमारी;

    ED raids : दिल्लीत EDची ३७ ठिकाणी छापेमारी; जाणून घ्या, काय आहे प्रकरण?

    ED raids

    ’हा’ घोटाळा मागील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात झाल्याचा आरोप आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: ED raids अंमलबजावणी संचालनालयाच्या(ED) पथकाने आज दिल्लीत ३७ ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील शाळांमधील वर्गखोल्या बांधकाम ‘घोटाळ्या’च्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. हा घोटाळा मागील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात झाल्याचा आरोप आहे.ED raids

    दिल्ली भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (एसीबी) च्या एफआयआरची दखल घेत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही छापेमारी केली. ईडीचे अधिकारी कंत्राटदार आणि खासगी संस्थांच्या किमान ३७ जागांची झडती घेत आहेत. काही नेत्यांच्याही ठिकाणांची झडती घेतली जात आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



    ३० एप्रिल रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ईडीने आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमधील माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

    दिल्ली सरकारी शाळांमध्ये १२ हजारहून अधिक वर्गखोल्या किंवा अर्ध-कायमस्वरूपी संरचनांच्या बांधकामात २००० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

    ED raids 37 places in Delhi Find out what the case is

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे