• Download App
    ओसामा बिन लादेनचा खातमा करण्यासाठीच अफगाणिस्तानात गेलो होतो, काम फत्ते आता माघार – ज्यो बायडेन USA army will back home declares president

    ओसामा बिन लादेनचा खातमा करण्यासाठीच अफगाणिस्तानात गेलो होतो, काम फत्ते आता माघार – ज्यो बायडेन

    विशेष प्रतिनिधी 

    वॉशिंग्टन – कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारणे आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन कारणांसाठी आम्ही अफगाणिस्तानात गेलो होतो. आमच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्यांना मारण्यास आम्ही गेलो होतो. आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले. आमच्या सैनिकांनी घरी परतण्याची वेळ आली आहे, असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११ सप्टेंबरपूर्वी अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघारी घेण्याची आज घोषणा केली. USA army will back home declares president

    सध्या अफगाणिस्तानात अमेरिकेचे सुमारे अडीच हजार सैनिक आहेत. आज बायडेन यांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘एकाच देशावर लक्ष केंद्रित करून हजारो सैनिकांना युद्धभूमीवर तैनात करणे आणि त्यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर खर्च करणे, हा प्रकार अतार्किक आहे.



    त्यामुळे अमेरिकेचे हे दीर्घकालीन युद्ध संपविण्याची वेळ आली आहे. येत्या एक मेपासून सैन्यमाघारीची अंतिम प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु होईल.’’

    अल कायदा या दहशतवादी संघटनेने ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात उतरले होते. अफगाणिस्तान सरकारबरोबर आम्ही चर्चा केली असून दहशतवाद्यांचा अमेरिकेला त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे, असे बायडेन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    USA army will back home declares president

    Related posts

    येमेनजवळ अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयात खळबळ!

    WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

    Indian economy : सरकारच्या उपाययोजनांची कमाल, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के, यापुढेही कायम राहणार वेग