Agri Economy : ट्रॅक्टर कंपन्यांनी गेल्या एका वर्षात मोठे विक्रम नोंदवले आहेत. देशातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्सने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. मार्च 2021 मध्ये 12,337 ट्रॅक्टर विकले गेले आहेत. या काळात कंपनीची विक्री 126.6 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये कंपनीने 5444 ट्रॅक्टरची विक्री केली होती. त्याचबरोबर सन 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने गत 82,252च्या तुलनेत 1,01,848 ट्रॅक्टर विकले आहेत. Tractor sales in one year broke all previous records, positive sign for agri economy
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ट्रॅक्टर कंपन्यांनी गेल्या एका वर्षात मोठे विक्रम नोंदवले आहेत. देशातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्सने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. मार्च 2021 मध्ये 12,337 ट्रॅक्टर विकले गेले आहेत. या काळात कंपनीची विक्री 126.6 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये कंपनीने 5444 ट्रॅक्टरची विक्री केली होती. त्याचबरोबर सन 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने गत 82,252च्या तुलनेत 1,01,848 ट्रॅक्टर विकले आहेत.
त्याचप्रमाणे सोनालिका ट्रॅक्टर्सनेही एका वर्षात 1,39,526 ट्रॅक्टर विक्री केली आहे. या कालावधीत कंपनीची विक्री 41 टक्के आहे. दोन्ही कंपन्यांनुसार, प्रथमच त्यांच्या ट्रॅक्टरची विक्री 1 लाखांच्या पुढे गेली आहे.
का वाढली विक्री?
डबलिंग फार्मर्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांच्या मते, कोणत्याही देशात ट्रॅक्टरची विक्री ही शेती क्षेत्राची वाढ होत असल्याचा पुरावा आहे आणि शेतकरी आनंदी आहेत. ट्रॅक्टर उद्योगाची सातत्याने होणारी वाढ हेच दर्शवते की, पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि खेड्यांमधून मजुरांचे शहरांत स्थलांतर करणे हेही त्याचे कारण आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढत आहे.
एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत जीडीपी वाढ उणे 23.9 टक्के नोंदवण्यात आली होती. अशा कठीण काळातही कृषी क्षेत्राची वाढ 3.4% अर्थात सकारात्मक होती. कोरोना लॉकडाऊनच्या वेळी सर्व काही बंद असताना शेती सुरूच होती. अॅग्री इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आणि राजीव गांधी मध्यवर्ती विद्यापीठ अरुणाचल प्रदेशचे कुलगुरू साकेत कुशवाह यांनी म्हटलंय की, शेती करण्याचे सर्वात मोठे आधुनिक शस्त्र म्हणजे ट्रॅक्टर. म्हणूनच जेव्हा त्याची व्याप्ती वाढली, तर विक्रीदेखील वाढणारच!
ट्रॅक्टरची गरज…
शेतकरी बांधव ट्रॅक्टरने जमीन नांगरून शेतीसाठी ती तयार करतात. पीक पेरणी, कापणी व मळणी, शेतमालाची वाहतूक इत्यादी अनेक प्रकारे ट्रॅक्टरचा शेतीत उपयोग होतो.
Tractor sales in one year broke all previous records, positive sign for agri economy
महत्त्वाच्या बातम्या
- लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम
- महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा
- निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची