विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या मुद्यावर कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी अर्थशास्त्र्याप्रमाणे मांडणी करत मोदी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण अभ्यास अपुरा पडल्याने आपल्याच वक्तव्याने ते चांगलेच फसले. बॅँकेतील ठेवींचे दर आणि महागाई दर यांचा संबंध जोडून सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारच्या काळात दोन आकडी महागाई दर आणि बॅँकेतील ठेवींशी तुलना करताना दुप्पट दर असल्याने राहूल गांधींवर खजिल होण्याची वेळ आली.Economist’ Rahul Gandhi talks about inflation but it was Inflation double during the UPA regime
राहूल गांधक्ष यांनी एक ट्विट करत म्हटलेी महागाई 6.95% वर गेली आहे, तर मुदत ठेव व्याज दर 5% वर गेला आहे. तुमच्या बँक खात्यांमध्ये 15 लाख रुपये जमा करणे विसरा, पीएम मोदींच्या ‘मास्टरस्ट्रोक’ने तुमची कष्टाने कमावलेली बचत नष्ट केली आहे.
मात्र, राहूल गांधी हे विसरले की अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात महागाईचा दर शिखरावर होता. त्यावेळी महागाई दर हा बॅँक ठेवींच्या व्याजदरापेक्षा जवळपास दुप्पट होता. यूपीएच्या काळात अनेक वर्षे ग्राहक किंमत निदेर्शांक वाढीचा दर दुहेरी अंकात होता.
2009 मध्ये वार्षिक महागाई दर 10.88 होता. तोच जी 2010 मध्ये 11.99 वर गेला. पुढील तीन वर्षांसाठी हे दर 8.86, 9.31 आणि 11.06 इतके होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर महागाईचा दर झपाट्याने घसरला. 2014 पासून, सरासरी वार्षिक महागाई दर 7% च्या खाली आहे. दुसरीकडे बँक ठेवींचे दर ५-९% च्या श्रेणीत आहेत.
ते महागाई दरापेक्षा कमी होते. उदाहरणार्थ, 2010 मध्ये जेव्हा महागाई 12टक्यांवर पोहोचली होती, तेव्हा 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी व्याजदर 6% ते 7% होता. याचा अर्थ राहुल गांधींच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या 1.95% च्या फरकाच्या तुलनेत यूपीएच्या काळातील हा फर 5% ते 6% पेक्षा जास्त होता.
Economist’ Rahul Gandhi talks about inflation but it was Inflation double during the UPA regime
महत्त्वाच्या बातम्या
- हनीट्रॅपर रेणू शर्मा हिला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागणी प्रकरण
- Navneet Rana : राणा दांपत्याचा जामीन घेण्यास नकार, पण नारायण राणे – फडणवीसांना “साद”!!
- शिवसेनेचे हिंदुत्व कसले गदाधारी?, उद्या त्यांच्या हातात झाडू येईल; नारायण राणेंचा टोला!!
- राणा दाम्पत्याची थेट मुख्यमंत्र्यांविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार; कटकारस्थान चिथावणीचे आरोप!!