भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : आज १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. Earthquake tremors in Gujarat ahead of India Pakistan match
या भूकंपाची तीव्रता 2.6 एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपाची तीव्रता खूपच कमी होती, त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कच्छमधील खवरा येथून १७ किमी अंतरावर रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. याआधीही कच्छमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसले आहेत. १ सप्टेंबर २०२३ रोजीही रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री ८.५४ वाजता ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र दुधईपासून १५ किलोमीटर दूर होते. त्याचवेळी दुधई येथेही ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
गेल्या २० वर्षांत कच्छमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कच्छ विद्यापीठाच्या संशोधनानुसार, यामागचे मुख्य कारण म्हणजे कच्छमध्ये ४ भूकंप फॉल्ट लाइन्स आहेत. यामध्ये इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटची सीमा देखील समाविष्ट आहे. आपापसात टक्कर होते आणि त्यामुळे भूकंपाचा धोका निर्माण होतो.
Earthquake tremors in Gujarat ahead of India Pakistan match
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण