वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपवाले घाबरले आहेत आणि म्हणूनच ते जाळीदार टोपी आणि लुंगीची भाषा करत जातीयवादावर उतरले आहेत, पण त्यांना हे माहिती नाही की प्रत्येक लुंगीवाला हा गुन्हेगार नसतो!!, अशा शब्दात काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सुनावले आहे. each lungiwala is not a criminal, answers congress leader rashid alvi
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत, असे वक्तव्य केशव प्रसाद मौर्य यांनी केले होते. त्यावरून रशीद अल्वी संतप्त झाले आणि त्यांनी प्रत्येक गुन्हेगार प्रत्येक लुंगीवाला हा गुन्हेगार नसतो, असे त्यांना सुनावले आहे.
अल्वी म्हणाले की उत्तर प्रदेशातील निम्मी हिंदू लोकसंख्या लुंगी घालते. त्यामुळे मौर्य यांच्या वक्तव्याचा अर्थ सर्व लुंगी परिधान करणारे गुन्हेगार आहेत का?, उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत आहे. पण भाजपाची निवडणूक जिंकण्याची हुशारी जनतेला समजली असून त्यामुळेच भाजप नेते घाबरुन जातीयवादी वक्तव्ये करत आहेत, असे अल्वी म्हणाले.
भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे, असे केशव प्रसाद मौर्य प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेत म्हणाले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते.
डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्यांना धमकावत असत. ते जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमकी द्यायचे. मात्र भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. सपा आणि बसपाच्या राजवटीतली टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत भाजपने संपवली आहे. व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने २०१४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, असे केशव प्रसाद मौर्य म्हणाले होते.
each lungiwala is not a criminal, answers congress leader rashid alvi
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे ‘ ; नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली टीका
- खामगावमध्ये ऑपरेशन वाघ; जमावबंदी, संचारबंदी लागू, नागरी वस्तीत वन विभागाची शोध मोहीम
- भिवंडी : गौतम कम्पाऊंड परिसरातील एका कारखान्याला लागली भीषण आग ; अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल
- ओमायक्रॉनचा धसक्याने क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळला; बिटकॉईन १० हजार डॉलरपर्यंत खाली