शहाजहान, अकबर, हुमायून किंवा जहांगीर यांना कसे विसरता येईल? असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल अध्याय काढून टाकल्याबद्दल टिप्पणी करताना, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी अजब विधान केलं आहे, “इतिहास पुसता येत नाही. मुघलांच्या काळात कधीही हिंदू, ख्रिचन किंवा शिखांना भीती वाटली नाही” असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी होतानाही दिसत आहे. During the 800 years of rule by the Mughals no Hindu Christian or Sikh ever felt threatened NC chief Farooq Abdullah
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता बारावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांसह अनेक स्तरांसाठी पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा केली, तेव्हा मुघल साम्राज्यावरील काही प्रकरणे वगळण्यात आली. NCERT अभ्यासक्रम वापरणार्या देशभरातील सर्व शाळांमध्ये या सुधारणांचा परिणाम दिसणार आहे.
या पार्श्वभूमीवर फारुख अब्दुल्ला म्हणाले, “इतिहास पुसता येत नाही. शहाजहान, अकबर, हुमायून किंवा जहांगीर यांना कसे विसरता येईल? ८०० वर्षांच्या (मुघलांच्या) राजवटीत कधीही हिंदू, ख्रिश्चन किंवा शीख यांना धोका वाटला नाही. लाल किल्ला, हुमायूनची कबर कशी लपवायची? ते (केंद्र सरकार) स्वत:च्या पायावर गोळी मारून घेत आहेत.’’
याशिवाय अब्दुल्ला यांनी यावेळी अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांचे नाव बदलण्याची घोषणा चीनने केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. अरुणाचल प्रदेश हा त्यांचा प्रदेश आहे असे चीनने नेहमीच कायम ठेवले असल्याने, आताच असे घडले नसल्याचे ते म्हणाले. भारत हा दावा मान्य करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
During the 800 years of rule by the Mughals no Hindu Christian or Sikh ever felt threatened NC chief Farooq Abdullah
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट
- कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा
- राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे
- तामिळनाडूतील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकात अमूल VS नंदिनी; काँग्रेसचा आरोप- गुजरात मॉडेलची गरज नाही! वाचा सविस्त