महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या जावयाच्या घरातून ड्रग्ज सापडल्याचे सांगितले होते. नवाब मलिक म्हणाले की, द्वारकेत ड्रग्ज पकडले हा योगायोग आहे का? नवाब मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना विनंती केली की, 1985 मध्ये कायदा यासाठीच करण्यात आला होता की, देश अंमली पदार्थमुक्त व्हावा.Drugs coming from Gujarat across the country drug connections will be brought says Nawab Malik
वृत्तसंस्था
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या जावयाच्या घरातून ड्रग्ज सापडल्याचे सांगितले होते. नवाब मलिक म्हणाले की, द्वारकेत ड्रग्ज पकडले हा योगायोग आहे का? नवाब मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना विनंती केली की, 1985 मध्ये कायदा यासाठीच करण्यात आला होता की, देश अंमली पदार्थमुक्त व्हावा.
तसेच गुजरातमधून ड्रग्ज येत असून गुजरातचे ड्रग्ज कनेक्शन देशासमोर आणू, असेही त्यांनी सांगितले. नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीचे डीजी हे प्रकरण गांभीर्याने घेतील, ही आमची विनंती आहे आणि त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नवाब मलिक लढाईत एकटे पडल्याचा प्रचार भाजपकडून होतोय, मात्र माझ्यासोबत पवार साहेब आणि मुख्यमंत्री दोघेही आहेत, असे नवाब मलिक म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवली नोटीस
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. कायदेशीर नोटीसमध्ये ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. नवाब मलिक आणि त्यांची मुलगी निलोफर मलिक खान यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या कायदेशीर नोटीसनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असताना फडणवीस यांनी समीर खान यांच्यावर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप केला.
कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दाखल केलेले आरोपपत्र तुम्ही केलेल्या कोणत्याही आरोपांचे समर्थन करत नाही. दिनांक 14/01/2021 च्या पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की घराची झडती घेण्यात आली आणि माझ्या क्लायंटच्या घरात किंवा खाली कोणताही प्रतिबंधित/संशयास्पद पदार्थ आढळला नाही, परंतु तुम्हाला असा खोटा, फालतू आणि निराधार अहवाल कोणत्या स्त्रोताकडून मिळाला, तुम्हाला चांगले माहिती आहे.
समीर खान यांना या वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि ते आता जामिनावर बाहेर आहे. कायदेशीर नोटीसवर टिप्पणी करताना नवाब मलिक म्हणाले की, माझ्या मुलीने आमच्या घरी ड्रग्ज सापडल्याच्या आरोपावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी आमची माफी न मागितल्यास आम्ही त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करू.
Drugs coming from Gujarat across the country drug connections will be brought says Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल