• Download App
    ड्रीम 11 कंपनीला आत्तापर्यंत सर्वात मोठा जीएसटी चुकविल्याबद्दल नोटिस!!|Dream 11 Company for biggest GST evasion ever!!

    ड्रीम 11 कंपनीला आत्तापर्यंत सर्वात मोठा जीएसटी चुकविल्याबद्दल नोटिस!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑनलाइन गेमिंग कंपनी ड्रीम इलेव्हन हिला तब्बल 40000 कोटी रुपयांचा जीएसटी चुकविल्याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नोटीस बजावली आहे. कंपनीने अद्याप या नोटिशीला उत्तर दिले नसून आतापर्यंत जीएसटी चुकविल्याची सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगितले जाते. मनीकंट्रोल वेबसाईटने ही बातमी दिली आहे.Dream 11 Company for biggest GST evasion ever!!



    ड्रीम 11 कंपनीच्या एकूण टर्नओव्हर आणि फायद्यातून 28% जीएसटी देणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष कंपनीने तो भरला नाही म्हणून ही नोटीस बजावली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने ही रक्कम 25000 कोटींची असल्याचे म्हटले आहे.

    2008 मध्ये हर्ष जैन आणि भावीत शेठ या दोघांनी एकत्र येऊन ड्रीम इलेव्हन ही ऑनलाईन गेमिंम कंपनी बनवली. दहा कोटी पेक्षा जास्त लोक त्याचे युजर्स आहेत क्रिकेट पासून कबड्डी पर्यंत अनेक खेळांचा त्यात समावेश आहे त्यात बेटिंग करून कॅश प्राईज जिंकण्याची कंपनी संधी देते. पण कंपनीच्या व्यवहारांमध्ये 2017 पासून काही अनियमितता आढळली आणि त्याची चौकशी केल्यानंतर तब्बल 40000 कोटी रुपये जीएसटी कंपनीने दिला नसल्याचे लक्षात आले त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कंपनीला नोटीस बजावली आहे

    Dream 11 Company for biggest GST evasion ever!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले