• Download App
    तिरुपतीमधील जगप्रसिद्ध व्यंकटेश्वराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी सुरक्षा कवच|DRDO protect Tirupati temple

    तिरुपतीमधील जगप्रसिद्ध व्यंकटेश्वराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी सुरक्षा कवच

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद – जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वचराच्या मंदिराला लवकरच ड्रोनविरोधी यंत्रणेचे सुरक्षा कवच मिळणार आहे. या यंत्रणेसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.DRDO protect Tirupati temple

    कर्नाटकातील कोलार येथे नुकतेच या यंत्रणेचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले होते. संभाव्य ड्रोन हल्ला परतवून लावण्याची क्षमता असणाऱ्या यातील एका यंत्रणेची किंमत ही २५ कोटी रुपये एवढी असून शंभर उपकरणांची खरेदी केल्यास हे एक उपकरण २२ कोटी रुपयांना उपलब्ध होऊ शकेल.



    या यंत्रणेत ‘हार्ड किल ऑप्शन’ उपलब्ध असून या माध्यमातून दीडशे मीटर ते एक किलोमीटरपर्यंतच्या हवाई हद्दीतील ड्रोन्सचा वेध घेऊन ते हवेतच नष्ट करता येऊ शकते.
    ‘डीआरडीओ’ ही संस्था भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या सहकार्याने या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहे.

    ही यंत्रणा चार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा सहज वेध घेऊ शकते. संबंधित ड्रोन्सच्या जीपीएस यंत्रणेला निकामी करण्याबरोबरच रिमोट लोकेटिंग सिस्टिमला निष्क्रिय करण्याचे सामर्थ्य या यंत्रणेत आहे.

    DRDO protect Tirupati temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू

    काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!