• Download App
    नंदिग्रामच्या महासंग्रामात 'ड्रामा-अॅक्शन-इमोशन' ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी 'आमने - सामने'।'Drama-Action-Emotion' in Nandigram's Mahasangrama; Repeatedly throughout the day; Mamata Banerjee and Suvendu Adhikari 'face-to-face'

    नंदिग्रामच्या महासंग्रामात ‘ड्रामा-अॅक्शन-इमोशन’ ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी ‘आमने – सामने’

    विशेष प्रतिनिधी

    नंदिग्राम: गुरूवारी पश्चिम बंगाल मधील निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला तब्बल 30 जागांसाठी हे मतदान झाले. मात्र काल दिवसभर चयांचा रंगली ती हाय व्होल्टेज लढत ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्या महासंग्रामाची. ‘Drama-Action-Emotion’ in Nandigram’s Mahasangrama; Repeatedly throughout the day; Mamata Banerjee and Suvendu Adhikari ‘face-to-face’



    ममता बॅनर्जी मतदान केंद्रावर तळ ठोकून होत्या त्यांनी मतदान केंद्रावर आंदोलन देखील केले.ममता बॅनर्जी एका मतदान केंद्रावर पोहोचताच भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले. परिस्थिती अशी झाली की ममता बॅनर्जी मतदान केंद्रातच अडकून पडल्या. अखेर त्यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना फोन केला. भाजपचे कार्यकर्ते इथे मतदान करून देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

    मी अशी निवडणूक कधीच बघितली नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. वगैरे वगैरे…

    माँ, माटी, मानूष या घोषणेच्या आधारावर लोकांचे आशीर्वाद घेऊन मी इथे जिंकणारच आहे. पण मला लोकशाहीची काळजी वाटते.विजय माझाच!असेही ममता दिदींनी स्पष्ट केले.

    यावरून भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाना साधला.

    ममतांनी २ तास मतदान रोखून धरलं. नाहीतर नंदीग्राममध्ये ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं असतं. ममतांचः सर्व नाटक होतं. ममतांना इथे कुठलाही पाठिंबा नाही. त्या निवडणुकीत पराभतू झाल्या आहेत असा दावा त्यांनी केला.

    ममतांचा हा ड्रामा केवळ मतदान रोखण्यासाठीच ममतांनी आंदोलन करून दोन तास मतदान रोखून धरले. त्यामुळे येथे ७८ टक्केच मतदान होऊ शकले.मात्र त्या सपशेल हारल्या आहेत.

    आता या हाय व्होल्टेज लढतीत कोण मारणार बाजी ये तो वक्त बतायेगा !

    ‘Drama-Action-Emotion’ in Nandigram’s Mahasangrama; Repeatedly throughout the day; Mamata Banerjee and Suvendu Adhikari ‘face-to-face’

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी