• Download App
    Chandrashekhar Azad खासदार चंद्रशेखर आझाद हा दलित महिलांच्या इज्जतीशी खेळला, तो दलित आंदोलनाला कलंक; डॉ. रोहिणी घावरींचा प्रहार

    Chandrashekhar Azad : खासदार चंद्रशेखर आझाद हा दलित महिलांच्या इज्जतीशी खेळला, तो दलित आंदोलनाला कलंक; डॉ. रोहिणी घावरींचा प्रहार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : खासदार चंद्रशेखर आझाद आधारित महिलांच्या इज्जतीशी खेळला. तो दलित आंदोलनाला कलंक आहे. त्याचा शेवट वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रखर शब्दांमध्ये डॉक्टर रोहिणी घावरी यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. आपल्या ट्विटर हँडल वरून डॉ. रोहिणी घावरी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर अनेक आरोप केले. 2024 मध्ये देखील रोहिणी घावरी यांनी अशाच आशयाचे आरोप चंद्रशेखर आझाद यांच्यावर केले होते. रोहिणी घावरी काही वर्षे चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर रिलेशनशिप मध्ये होत्या. Chandrashekhar Azad

    रोहिणी धावरी या वाल्मिकी समाजातून येतात. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास केला असून स्वित्झरलँड मधून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातल्या परिसंवादांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.

    डॉ. रोहिणी घावरी काही वर्षे चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. परंतु, या दरम्यान आझादने आपल्याला फसविले. तो विवाहित असल्याचे सांगितले देखील नाही. केवळ आपल्यालाच नाही, तर अनेक दलित महिलांना चंद्रशेखर आझादने फसविले. त्यांच्यावर अत्याचार केले, असा आरोप रोहिणी घावरी यांनी ट्विटर हँडल वर केला.

    रोहिणी घावरी यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की :

    महापुरुषांनी चालविलेल्या दलित आंदोलनात चंद्रशेखर आजादचे नाव यावे अशी त्याची लायकी नाही. गेल्या दहा वर्षांत त्याने दलित युवकांसाठी कुठलेही काम केलेले नाही. भाजपच्या कृपेने तो खासदार बनला, पण तो समाजाचा कधीही खरा नेता बनू शकला नाही. त्याचे खरे घृणास्पद चारित्र्य माझ्या एवढे कोणालाही माहिती नाही.

    2027 च्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम यांची मते कापण्यासाठी भाजप चंद्रशेखर आझादचा वापर करून घेईल आणि नंतर त्याला फेकून देईल. त्याने मला जेवढी तकलीफ दिली आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट तकलीफ त्याला होईल. त्याने एका सच्चा महिलेचा छळ केलाय त्याची शिक्षा त्याला जरूर मिळेल. त्या दिवसाची मी वाट पाहात आहे.

    Dr Rohini Ghavari targets MP Chandrashekhar Azad over his character

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले