विशेष प्रतिनिधी
मुंबई : परदेशात बोलताना राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेसवर आरक्षण विरोधी असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांचा पराभव केल्याचा मुद्दाही या निमित्ताने चर्चेत आला आहे. काँग्रेसने एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांचा पराभव केला होता ते देखील अगदी ठरवून. यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या स्विय सहाय्यकाला फोडून त्यांच्या विरोधात उभे केले होते.
भारतीय घटनेचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकसभेत येऊ नयेत यासाठी काँग्रेसने डावच आखला. प्रथम त्यांना मुंबईत पराभूत केले. त्यानंतर पोटनिवडणुकीत भंडारा येथून पराभूत केले.
स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशी जवळपास चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चालली. त्यावेळी जवळपास 100 मतदारसंघ हे द्विसदस्यीय होते. याचा अर्थ एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत. निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ उत्तर मुंबई हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता.
27 सप्टेंबर 1951 रोजीआंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना निवडून येऊ द्यायचे नाही असा चंग बांधला होता. याची जबाबदारी त्यावेळी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांच्यावर सोपविली
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशननेकेवळ 35 जागा त्यांनी लढवल्या. त्यातले एक उमेदवार स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.त्यांनी सोशालिस्ट पार्टीशी 1 नोव्हेंबर 1951 रोजी दिल्लीत या युतीचा करार झाला. उत्तर मुंबई या द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण जागेवर सोशालिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं, तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर स्वत: आंबेडकर उभे राहिले.
काँग्रेसकडून सर्वसाधारण जागेवर व्ही. बी. गांधी, तर राखीव जागेवरून म्हणजे आंबेडकरांविरोधात नारायणराव काजरोळकर यांना तिकीट देण्यात आलं. ते आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते. कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीपाद अमृत डांगे, पुढे जाऊन जनसंघात विलीन झालेल्या राम राज्य पार्टीकडून केशव जोशी, तसंच हिंदुत्त्ववादी नेते गोपाळराव देशमुख असे एकूण 8 उमेदवार या मतदारसंघातल्या दोन जागांसाठी उभे होते. आम्ही काँग्रेस पक्षाविरुद्ध एक प्रबळ अशी विरोधी आघाडी उभी करू अन् काँग्रेस पक्षाची दुष्कृत्ये चव्हाट्यावर आणू, अशी आंबेडकरांची भूमिका होती.
मात्र या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला. नारायणराव काजरोळकरांना 1 लाख 38 हजार 137 तर बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 23 हजार 576 मते मिळाली. काँग्रेसच्या काजरोळकरांनी आंबेडकरांचा तब्बल 14 हजार 561 मतांनी पराभव केला.
काँग्रेसला याचा पश्चाताप झाला नाही. मात्र निवडून आलेले उमेदवारनारायणराव काजरोळकर यांना अपराधी वाटत होते. माईसाहेब लिहितात, तेसांहेबांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये भेटायला आले. कदाचित त्यांना समोर येण्यात अपराधीपणा म्हणा किंवा संकोच वाटत असावा, असे मला वाटते. कारण ते संकोचाने सामोरे आले. त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलकीने जवळ बोलावले. काजरोळकर आले व त्यांनी क्षणार्धात साहेबांच्या पायावर डोकं ठेवले. साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठवलं आणि शेजारी बसवून घेतलं व निवडून आल्याबद्दल उदार मनाने त्यांचे अभिनंदन केले.’
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या पराभवानं मोठा धक्का बसला होता. इतका की आधीपासूनच विविध आजारांशी लढत असलेल्या आंबेडकरांची या काळात तब्येतही खालावली. दोनच वर्षांनी भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक लागली, तेव्हा तिथे आंबेडकर उभे राहिले. मात्र, तिथेही काँग्रेसच्या उमेदवारानंच त्यांचा पराभव केला.ही आंबेडकरांची शेवटची निवडणूक ठरली. कारण पुढे दोन वर्षांनी म्हणजे 1956 साली त्यांचं निधन झालं. मुंबईतून मुख्य निवडणुकीत बाबासाहेबांसोबत पराभूत झालेल्या अशोक मेहता यांना समाजवादी पक्षाने सर्वसाधारण जागेवरून भंडारा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार म्हणून घोषित केले, तर राखीव मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशनचे (शे. का. फे.) उमेदवार म्हणून उभे राहिले होते. (या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वसाधारण जागेवरून पूनमचंद राका यांना, तर राखीव जागेवरून भाऊराव बोरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यातही बोरकर यांनी त्यांचा ८,३८१ मतांनी पराभव केला.
Dr. Babasaheb Ambedkar was decisively defeated by Congress not once but twice
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil : अजितदादांना त्यांच्याच राष्ट्रवादीचे बारामतीतून “परस्पर” तिकीट; जयंत पाटलांची “करामत”!!
- Sitaram Yechury : CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक!
- Naib Saini : हरियाणात मुख्यमंत्री नायब सैनी यांनी लाडवा येथून दाखल केला उमेदवारी अर्ज
- Hardeep Singh Puri : शीखांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करणार!