• Download App
    Mayawati 'आरक्षणाबाबत दुटप्पी धोरण', म्हणत

    Mayawati : ‘आरक्षणाबाबत दुटप्पी धोरण’, म्हणत मायावतींनी राहुल गांधींवर केली टीका

    Mayawati

    जातीय जनगणनेच्या मुद्य्यावरूनही प्रश्न उपस्थित केला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावरून अमेरिकेत सुरू असलेला गदारोळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वक्तव्यावरून भाजप नेते काँग्रेस आणि राहुल यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्याचवेळी बसपा सुप्रीमो मायावती यांनी राहुल यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा निशाणा साधला आहे.

    राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत मायावती म्हणाल्या की, आरक्षणाबाबत काँग्रेसचे धोरण दांभिक आहे. त्यांनी जनतेला काँग्रेसच्या दुटप्पीपणा लक्षात घेण्या सांगितले.



    मायावती म्हणाल्या की, केंद्रातील त्यांच्या सरकारने ओबीसी आरक्षणाशी संबंधित मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही हे देखील खरे आहे. तसेच, बसपाच्या संघर्षामुळे, काँग्रेसने SC/ST च्या पदोन्नतीतील आरक्षणाला लागू करण्यासाठी संसदेत आणलेल्या घटना दुरुस्ती विधेयकाला परवानगी दिली नाही, जे अद्याप प्रलंबित आहे. तसेच त्यांच्या सरकारने या प्रकरणी न्यायालयात योग्य युक्तिवाद केला नाही.

    या आरक्षणविरोधी काँग्रेस आणि इतर पक्षांचेही भान या लोकांना असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. तसेच केंद्रातील काँग्रेस सरकारने जात जनगणना न करणे आणि आता सत्तेबाहेर राहून आवाज उठवणे, हा दांभिकपणा नाही तर काय आहे? असंही मायावती म्हणाल्या आहेत.

    Double policy on reservation Mayawati criticized Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार