विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक नेता निवडी शिवाय आणि संयोजक नेमल्याशिवाय पार पडली, पण त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य खासदार शशी थरूर यांनी पक्षांतर्गतच राजकीय बॉम्बस्फोट केला आहे. राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार करू नका, असा परखड सल्ला त्यांनी “इंडिया” आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. Don’t make Rahul Gandhi the prime ministerial candidate
2024 च्या लोकसभा निवडणुकीत “इंडिया” आघाडीने कोणत्याही नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू नये. राहुल गांधींना तर बिलकुलच करू नये, असे शशी थरूर म्हणाले.
शशी थरूर यांनी काही महिन्यांपूर्वीच गांधी घराण्याचे फेव्हरेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, पण काँग्रेस अंतर्गत गांधी परिवार निष्ठ राजकारणात त्यांचा पराभव झाला. पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांना काँग्रेस कार्यकारणीवर नेमले. आता त्यांनी थेट राहुल गांधींच्या आज पंतप्रधान पदाच्या जाहीर न केलेल्या उमेदवारीला “खो” घातला. राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणे यातून “इंडिया” आघाडीचा तोटाच होईल, अशी शक्यता शशी थरूर यांनी व्यक्त केली. त्यापेक्षा “इंडिया” आघाडीने संघटित स्वरूपात लोकसभा निवडणूक लढवावी. निवडणुकीत विजय मिळवावा आणि त्यानंतर पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली.
प्रादेशिक पक्षांना आनंदच
पण या सूचनेमुळे काँग्रेस मधूनच राहुल गांधींच्या विरोधात आवाज उमटल्याने “इंडिया” आघाडीतल्या प्रादेशिक पक्षांना राजकीय बळ प्राप्त झाले आहे. तृणमूळ काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, शरदनिष्ठ राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट या पक्षांना तसेही राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार नकोच आहेत, पण भाजपच्या पराभवासाठी ते काँग्रेस बरोबर जायला तयार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला काँग्रेस मधूनच “खो” घातल्याने इंडिया आघाडीतल्या वर उल्लेख केलेल्या पक्षांच्या नेत्यांना आनंदच होणार आहे.*
पण काँग्रेस अंतर्गत मात्र या बॉम्बस्फोटाने वेगळीच खळबळ निर्माण केली आहे. शशी थरूर यांच्या बाजूने अद्याप तरी कोणी उघड बोललेले नाही, पण त्यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस मध्ये राहूनच वेगळा आवाज बाहेर काढला हे मात्र निश्चित!!
Don’t make Rahul Gandhi the prime ministerial candidate
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
- आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा
- Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ