विशेष प्रतिनिधी
पुणे : देशाच्या अन्नपुरवठ्या मध्ये सर्वात मोठे योगदान असलेल्या आणि देशाच्या संरक्षणातही मोलाचं योगदान असणाऱ्या पंजाबमधील शेतकर्यांना दुखावून चालणार नाही, असे शरद पवार यांनी मोदी सरकारला सांगताना म्हटले आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना ते बोलत होते.
Don’t hurt the farmers of Punjab, the country has paid the price till the assassination of Indira Gandhi: Sharad Pawar
जेव्हा देशाच्या संरक्षणाचा विषय येतो, तेव्हा पंजाबमधील शेतकरी स्वत: लढायला तयार होतो. पंजाबमधील शेतकरी दुखावले तर त्याची किंमत काय आहे, हे आपण एकदा अनुभवले आहे. याची किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येने दिली आहे. त्यामुळे पंजाबमधील शेतकर्यांना दुखावू नका. असा इशारा शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर वेळोवेळी भाष्य केले आहे. यावेळी देखील आपली भूमिका मांडताना ते म्हणतात की, पंजाबमधील शेतकर्यांना अस्वस्थ होऊ देऊ नये. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष देत नाहीये. मागील एका वर्षांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. पण सरकार मात्र ह्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येतेय. असे चालणार नाही.’
‘पंजाब हे सीमा रेषेवरील एक राज्य आहे. पंजाबची सीमा ही पाकिस्तानला जोडून आहे. त्यामुळे देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णता असणाऱ्या या राज्यातील काही प्रश्नांसाठी जर शेतकरी आग्रहाने आंदोलना बसला असेल तर राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ही राष्ट्राची गरज आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
Don’t hurt the farmers of Punjab, the country has paid the price till the assassination of Indira Gandhi: Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!