• Download App
    Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला दमबाजी; पण अमेरिकन दूतावासाकडून भारताची मनधरणी!!

    डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला दमबाजी; पण अमेरिकन दूतावासाकडून भारताची मनधरणी!!

    नाशिक : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर 50 % टेरिफ लादायची दमबाजी; पण अमेरिकन दूतावासाकडून भारताची मनधरणी!!, असली दुहेरी आणि दुटप्पी राजनैतिक कसरत आज समोर आली. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 % टेरिफ लादायच्या कागदावर सही केली, तर दुसरीकडे भारतातल्या अमेरिकन दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातल्या वाढत्या सहकार्याची मखलाशी केली.

    भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करतो‌. त्यामुळे रशियाला भरपूर डॉलर्स मिळतात. रशिया ते डॉलर्स युक्रेन विरुद्धच्या युद्धात खर्च करतो, असा दावा करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध आगपाखड केली. भारतावर 50 % टेरिफ लादायची दमबाजी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले युद्ध थांबविण्याचे वारंवार credit घेतले. रशिया आणि चीन यांच्यावर पुरेसा दबाव आणता येत नाही त्यांना अमेरिकेच्या मताप्रमाणे वाकवता येत नाही म्हणून ट्रम्प यांनी भारताला वाकवायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी राजनैतिक सभ्यतेच्या पलीकडची भाषा सुद्धा वापरली, पण भारत दबला नाही आणि झुकलाही नाही. तरी देखील ट्रम्प यांनी भारताला दमबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार चर्चेत अडथळा निर्माण झाला.

    – अमेरिकन राजनैतिक वर्तुळाची गोची

    या पार्श्वभूमीवर अमेरिकन राजनैतिक वर्तुळाची मोठी गोची झाली. अमेरिकन राजनैतिक वर्तुळाला ट्रम्प यांची आक्रमक भाषा सहन होईना आणि तसे जाहीरपणे सांगताही येईना. ट्रम्प यांची भाषा राजनैतिक वर्तुळाच्या पलीकडची असल्याने ती वापरताही येईना. त्यामुळे एकीकडे ट्रम्प यांची दमबाजी सुरू असताना दुसरीकडे अमेरिकन राजनैतिक वर्तुळाने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून भारताची मनधरणी चालवली. याचा प्रत्यय इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या तिसऱ्या ऊर्जा परिषदेत आला. नवी दिल्लीत भरलेल्या या परिषदेत अमेरिकन दूतावासाच्या, पण मूळच्या चिनी वंशाच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी श्यावओबिंग फेंग यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सर्व क्षेत्रांमधल्या वाढत्या सहकार्याची ग्वाही दिली.



    चिनी वंशाच्या अमेरिकन अधिकाऱ्याचे भाषण

    भारत आणि अमेरिका यांची सरकारे दोन्ही देशातल्या नागरी अणु उर्जा कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कटीबद्ध आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या कंपन्या एकमेकांशी व्यापार आणि सहकार्य करतील. आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतर करतील. आण्विक सहकार्य वाढवतील. भारतातल्या अणुभट्ट्या विकसित करतील. त्यांचे आधुनिकीकरण करतील. या कामातला वेग वाढेल. आण्विक धोके टाळण्यामध्ये जे मतभेद असतील, ते दूर करतील, असे श्यावओबिंग फेंग यांनी सांगितले. त्यांनी “टेरिफ” या शब्दाचा उच्चार देखील संपूर्ण भाषणात केला नाही. त्या उलट भारत आणि अमेरिका यांच्यातल्या वाढत्या सहकार्याच्या क्षेत्रांवर त्यांनी भर दिला. सगळ्या सकारात्मक बाबी सांगितल्या, जेणेकरून भारतीय राजनैतिक वर्तुळ सुखावेल, अशी सगळी भाषा वापरली. मतभेदांच्या मुद्द्यांना गोड गुलाबी शब्दांनी स्पर्श केला. त्यांनी ट्रम्प यांनी लावलेल्या आगीत आणखी तेल ओतले नाही. उलट ती शमवायचा प्रयत्न केला.

    या सगळ्या प्रकारामुळे अमेरिकेचा दुहेरी आणि दुटप्पी राजनैतिक व्यवहार समोर आला. राजनैतिक क्षेत्रात नुसती आक्रमक भाषा वापरून चालत नाही, तर सामंजस्याची भाषाच वापरावी लागते, तरच टिकून राहता येते, याचा “आरसा” अमेरिकन दूतावासातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना दाखविला.

    Donald Trump threatened India, but American diplomats appease India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Warns : भारताने म्हटले- मानवतावादी भूमिकेने पाकिस्तानला पुराचा इशारा दिला; ऑपरेशन सिंदूरनंतर थांबली चर्चा

    Mumbai High Court : योगींवर बनवलेल्या चित्रपटाला मुंबई हायकोर्टाची मंजुरी; CBFCला कोणताही कट न करता प्रदर्शित करण्याचे निर्देश

    Donald Trump : चेंगट व्यापारी ते असीम मुनीरची अमेरिकन आवृत्ती!!