नाशिक : अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाच्या ट्विटरवर उड्या, पण प्रत्यक्षात डच्चू मिळण्याची शक्यता!!, हेच राजकीय वास्तव एका फोन कॉल मुळे समोर आले. Donald Trump
– ट्रम्प – असीम मुनीर फोन कॉल
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पण ती घोषणा करण्यापूर्वी त्यांनी दोन फोन कॉल केले. त्यापैकी दुसरा फोन कॉल त्यांनी इजराइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना केला. पण पहिला फोन कॉल मात्र त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना न करता पाकिस्तानचा स्वयंघोषित फील्ड मार्शल असीम मुनीर याला केला. ट्रम्प यांच्या फोन कॉल नंतर असीम मुनीर याने इराण मधल्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याशी झालेली बोलणे नंतर ट्रम्प यांच्या कानावर घातले. ट्रम्प यांनी इजरायली पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर युद्धविराम घोषित केला.
– शहाबाज शरीफ यांना वगळले
या सगळ्या प्रक्रियेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना वगळून टाकले. पण शहाबाज शरीफ यांनी ट्विटर वर मात्र पाकिस्तानने मध्यस्थी करून युद्ध थांबविण्याची टिमकी वाजवली. युद्धविरामापूर्वीसुद्धा शहाबाज शरीफ यांनी ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प आणि इराणी नेत्यांची युद्धविराम करण्याची मनधरणी करत असल्याचे सांगितले.
– क्रिप्टो खासगी व्यवहार ठरला महत्त्वाचा
पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प आणि इराणी नेत्यांनी शहाबाज शरीफ यांना विचारात सुद्धा घेतले नाही. दोन्ही बाजूंनी पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याची अनौपचारिक मध्यस्थी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प यांनी असीम मुनीर याची मध्यस्थी स्वीकारण्याचे कारण दोघांमधला क्रिप्टो करन्सीच्या खासगी व्यवहाराचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. त्यामध्ये अमेरिकेचे आणि इराणचे राष्ट्रहित किंवा पाकिस्तानी राष्ट्राची मध्यस्थी हे मुद्दे दुय्यम ठरले.
– पाकिस्तानात सत्तांतर शक्य
या सगळ्या घडामोडींमुळे पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचीच खुर्ची एकतर औपचारिकता उरली. किंबहुना ती धोक्यात आली. कारण अमेरिकेच्या संमतीशिवाय कुठलाच राज्यकर्ता पाकिस्तानात राज्य करू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी शहाबाज शरीफ यांना फोन कॉल न करता नुसता तोडला नाही, तर त्यांच्या ऐवजी असीम मुनीर याला फोन कॉल करून पाकिस्तानातल्या भविष्यातल्या सत्तांतराची चाहूल दिली.
Donald Trump signals regime change in Pakistan
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला मिळणार स्वतंत्र AI विभाग; फडणवीस सरकार स्थापन करणार नवे आयुक्तालय!!
- पार्थचे वक्तव्य पडले पवार गटाच्या पथ्यावर; विलीनीकरण फिस्कटल्यावर निघाले लाईन मारायला काँग्रेसवर!!
- महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना, भांडवली बाजारात सूचीबद्धतेचा फडणवीस सरकारचा निर्णय
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना फटकारले; तपास NIA कडे