• Download App
    पवारांना मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणाऱ्यांकडे पवारांच्या वारसांचे राजकीय भवितव्य घडविण्याची क्षमता आहे का?? Does opposition parties have capacity to assure supriya sule's political future as per sharad pawar's wish??

    पवारांना मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणाऱ्यांकडे पवारांच्या वारसांचे राजकीय भवितव्य घडविण्याची क्षमता आहे का??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणाऱ्यांकडे “पवारांच्या मनातले” राजकीय नियोजन अंमलात आणण्याची क्षमता आहे का??, असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. याचा सरळ अर्थ असा की पवारांच्या वारसांचे राजकीय भवितव्य विरोधक घडवू शकतात का??  Does opposition parties have capacity to assure supriya sule’s political future as per sharad pawar’s wish??

    कारण महाविकास आघाडीतील सगळ्याच घटक पक्षांचे नेते पवारांना मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्यासाठी उतावीळ झाले आहेत. शरदनिष्ठ राष्ट्रवादीतले नेतेही त्यांना सामील आहेत. महाविकास आघाडीत आपण आहोत, हे लोकांसमोर दाखवण्यासाठी तसे करणे ही शरदनिष्ठ राष्ट्रवादीची राजकीय गरज आहे, पण तरी देखील शरद पवार मात्र या सगळ्यांना झुगारून पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार लोकमान्य टिळक पुरस्काराच्या व्यासपीठावर मोदींची शेजारी बसणार आहेत.

    राजकीय मतभेद विसरून विशिष्ट राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक गोष्टींसाठी एकत्र येणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असल्याचे बोलले जाते आणि ते काही प्रमाणात खरे देखील आहे. पवार त्यांच्या वयाच्या राजकीय ज्येष्ठतेनुसार काही प्रमाणात महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात, हे देखील खरे आहे.

    पण म्हणून केवळ आणि केवळ महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जगाला दाखविण्यासाठीच पवार हे मोदींबरोबर लोकमान्य टिळक पुरस्काराच्या व्यासपीठावर त्यांच्या शेजारी बसणार आहेत का??, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर “नाही”, या शब्दाने देता येते. 



    कारण केवळ महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवण्यासाठी पवार हे मोदींशेजारी बसतासात, हे म्हणणे अर्धसत्य ठरणारे आहे. मग पूर्ण सत्य काय आहे??, तर पूर्ण सत्य “पवारांच्या मनातल्या” राजकीय नियोजनात दडले आहे. पवारांच्या उरलेल्या कारकीर्दीतील “त्यांच्या मनातल्या” राजकीय भवितव्याची सोय लावण्याची क्षमता सध्याच्या पवार समर्थकांमध्ये नसून ती फक्त आणि फक्त मोदींमध्येच आहे, ही राजकीय अपरिहार्यता आज स्वीकारावी लागते. मग “पवारांच्या मनातली” राजकीय भवितव्याची सोय म्हणजे नेमके काय??, तर ती सोय म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय सोय लावणे ही होय!!

    सुप्रिया सुळे यांची भविष्यातली राजकीय सोय लावण्याची क्षमता पवारांना मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणाऱ्यांकडे बिलकुल नाही. ती क्षमता फक्त मोदींकडे आहे… आणि हे ओळखूनच पवार नियोजित कार्यक्रमानुसार मोदींच्या शेजारी व्यासपीठावर जाऊन बसणार आहेत.

    तेथे पवार काय भाषण करतील?? त्यानंतर मोदी त्यांना काय उत्तर देतील?? या विषयी जोरदार अटकळी बांधता येऊ शकतील. त्या अटकळी कदाचित बरोबर किंवा चुकीच्या ठरू शकतील. पण एक अधोरेखित असलेली वस्तुस्थिती बदलणार नाही, ती म्हणजे पवारांनी जर एखादे राजकीय वक्तव्य टिळक पुरस्काराच्या व्यासपीठावरून केले, तर मोदी पवारांचा आदर जरूर राखतील पण चपखल उत्तर द्यायलाही ते विसरणार नाहीत हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे!!

    पवार मोदींशेजारी व्यासपीठावर बसणे हे जितके महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून आहे, तितकेच ती पवारांची राजकीय अपरिहार्यता आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही किंबहुना ती अधिक अपरिहार्यतेने स्वीकारावी लागेल.

    Does opposition parties have capacity to assure supriya sule’s political future as per sharad pawar’s wish??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!