मोदींना हिंदू-मुस्लीम वाद उकरून उत्तर प्रदेश जिंकायचाय का? विचारते झाले!!
`प्रतिनिधी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस पाळण्याचे जाहीर करतात काँग्रेसजनांच्या “राजकीय वेदना” उफाळून आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फाळणीचा विषय काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशच्या निवडणूका हिंदू मुस्लिम वादावर जिंकायचे आहेत का? असा सवाल केला आहे. मोदींच्या एका ट्विटमुळे नाना संतापले आहेत. त्यांनी नागपूरमधल्या “व्यर्थ न हो बलिदान” या कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहून लगेच राजकीय विषयाला हात घातला आणि मोदींवर सडकून टीका केली. Does Modi Want To Win Uttar Pradesh Elections By Inciting Hindu – Muslim Riots, asks angry Nana Patole
नाना म्हणाले, की देशात १४ ऑगस्ट १९४७ मध्ये रक्तपात घडला. हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण केले गेले. पंतप्रधान मोदींनी आता पुन्हा त्याची स्मृती म्हणून हा १४ ऑगस्ट स्मृती दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. स्मृतीचा अर्थ काय असतो? त्याचा अर्थ म्हणजे पुन्हा आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याचा प्रयत्न करायचा, असा होतो. नरेंद्र मोदींना तो रक्तपाताचा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा का करायचा आहे? पुन्हा या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करायचा आहे का? उत्तर प्रदेशच्या निवडणुका हिंदू – मुस्लिमांच्या वादावरून पुन्हा जिंकायच्या आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.
सध्याची लढाई सोपी नाही. हिंदू – मुस्लिम हे एक आहेत. पण त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपाचे लोक करतात. या देशाला तोडण्याचे, संविधान संपवण्याचे पाप करत असतील तर अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढे येत या देशद्रोहींच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
नाना पटोले म्हणाले :
– ज्या लोकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले या सर्व थोर महत्म्यांची स्मृती, त्यांची आठवण आपण सगळ्यांनी आपल्या मनात तेवत ठेवून आणि नवीन पिढीपर्यंत हा संदेश बलिदानाचा, त्यागाचा आणि काँग्रेसचा पोहचावा यासाठी या कार्यक्रमाची सुरूवात आपण १ ऑगस्टपासून आपण पूर्ण वर्षभर करण्याचा निर्णय घेतला आहे.
– देशामध्ये ज्यांचा कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नाही, ज्यांचा कधीही त्याग व मानवतेशी संबंध नाही, अशा विचाराचे सरकार देशात आलं आणि त्याचा परिणाम मागील सात वर्षांमध्ये आपला देश कसा भोगतोय? सर्व सामान्यांचं जगणं आणि आता आपलं संविधान वाचेल की नाही वाचेल? अशी शंका आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे. चीनने सीमा ओलांडून आपल्या देशात प्रवेश केला, मोठ्या कष्टाने, त्यागाने व बलिदानाने आपल्याला मिळालेलं स्वातत्र्य टिकेल की नाही टिकेल? असे आज वातावरण आहे.”
– राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचे पाप
दिल्लीत एक नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला, दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या म्हणजेच गृहमंत्री अमित शाह यांच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी अत्याचार होतो म्हणून आपले नेते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या परिवारासाठी ट्विटद्वारे संदेश पाठवला. देशात शेतकऱ्यांविरोधात जे तीन काळे कायदे आणले गेले, या कायद्यांचा विरोध राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत तेवढ्याच ताकदीने केलेला आहे. दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असं सांगणारं सरकार, आज युवकांना बेरोजगार करतं आहे.
म्हणून बेरोजगारांचा आवाज राहुल गांधी झाले. छोटा व्यापारी उध्वस्त झाला. गरिबांना आता दोन वेळचं जेवण मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून राहुल गांधींनी त्यांचा आवाज बनून सरकार समोर उभा ठाकत, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचं ट्विटर अकाउंटच बंद करण्याचा पाप भाजपाच्या मोदी सरकारने केले. आवाज बंद करण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. आपण लोकशाहीत आहोत, याचंही भान केंद्र सरकारला नसेल, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता सत्तेसाठी नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि संविधानासाठी लढाई उभी करण्यासाठी काम केलं पाहिजे.
Does Modi Want To Win Uttar Pradesh Elections By Inciting Hindu – Muslim Riots, asks angry Nana Patole
महत्त्वाच्या बातम्या
- World Youth Championships : पोलंडमध्ये भारतीय तिरंदाजांनी फडकावला तिरंगा, महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही जिंकले सुवर्ण
- सौर, पवन ऊर्जेच्या क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर, १ लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही
- वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा
- जम्मू -काश्मिरात यावर्षी खास असणार स्वातंत्र्यदिन, तब्बल 23,000 सरकारी शाळांवर तिरंगा फडकणार